‘मराठी साहित्याच्या इंग्रजी अनुवादाला अमेरिकेत चांगला वाव’
प्रतिनिधी
मराठीतील दर्जेदार आणि चांगली पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली तर या साहित्याला अमेरिकेमध्ये चांगला वाव मिळेल. त्यासाठी मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन असा प्रयत्न अधिक जोमाने करायला पाहिजे, असे मत मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
पुस्तक महोत्सवात तेथील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांच्याशी चर्चा करताना त्यांनीही मराठी साहित्य, प्रकाशित होणारी पुस्तके याबद्दल उत्सुकतेने विचारणा केली. त्यातूनच असे लक्षात आले की, मराठीतील काही निवडक आणि दर्जेदार साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित झाले तर त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळू शकेल. मात्र त्यासाठी जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन या कामासाठी एखादी कंपनी स्थापन करावी आणि मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे काम हाती घ्यावे. मराठीतील काही निवडक पुस्तकांचा सारांश इंग्रजीमध्ये अनुवादित करून आपल्याकडे पाठवावा, अशी अपेक्षाही लंडन महोत्सवात काही जणांनी व्यक्त केल्याचे मेहता यांनी सांगितले.
इंग्रजीमधील प्रसिद्ध लेखक जेम्स पॅटर्सन यांचे एक पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केले असून त्याची एक प्रत आपण लंडन महोत्सवात त्यांना भेट दिली. पुस्तक पाहून ते अतिशय खुष झाले. भारतीय प्रादेशिक भाषेत आपले पुस्तक अनुवादित झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगून मेहता पुढे म्हणाले की, जेम्स यांना भारतीय व महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दल पूर्ण माहिती असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
लंडनमधील नागरिकांना वाचनाची प्रचंड आवड असल्याचे मला दिसून आले. तेथे रेल्वे किंवा बसच्या प्रवासात जवळपास प्रत्येक प्रवाशाच्या हातात पुस्तक किंवा वर्तमानपत्र असतेच. तसेच तेथील पुस्तकांची दुकाने अतिशय मोठी असतात. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर फॉईल्स व बॉर्डर या दोन दुकानांना मी भेट दिली. सुमारे एक लाख चौरस फूट जागेत आणि पाच मजल्यांच्या भव्य इमारतीत ही दुकाने होती. लंडन येथील पुस्तकांची दुकाने आणि गोदामात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. लंडनमधीलच गार्डनर्स बुक हाऊस येथे तर दररोज लाखो पुस्तकांची आवक-जावक होते. येथे पुस्तके देण्यासाठी यंत्रमानव असून तुम्ही संगणकावरून पुस्तकांची मागणी केली की यंत्रमानव काही मिनिटात ते पुस्तक आपल्या समोरील ट्रेमध्ये आणून ठेवतो, अशी माहितीही मेहता यांनी दिली.
जर्मन किंवा अरेबिक भाषेतील काही पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करायची असतील तर त्यासाठी त्यांच्याकडून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.
Tuesday, April 28, 2009
Saturday, April 25, 2009
निवडक मराठी साहित्यिक इंटरनेटच्या महाजालात
मराठीतील निवडक साहित्यिक ‘इंटरनेटनेट’च्या महाजालात!
मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता इंटरनेटच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी आदींचा समावेश असून लवकरच गो. नि. दांडेकर यांच्यावरील संकेतस्थळही सुरू होणार आहे.
जी. ए. कुलकर्णी यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असे असून त्यांच्या समग्र साहित्याची नोंद www.gakulkarni.info या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांचा जीए यांच्यावरील लेख यावर असून हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. जीए यांच्या तीन कथा येथे वाचता येतात. पु. ल. देशपांडे यांच्यावरील www.puladeshpande.net संकेतस्थळावर ‘अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता, किती घेशील दो कराने’ असे वाक्य दिले असून पुलंचे साहित्य आणि मराठी रसिकांना त्यांनी आजवर जे जे काही दिले आहे, ते पाहता, ते वाक्य सार्थ असल्याचे पटते. या संकेतस्थळावर साहित्यिक पुल, छोटय़ांसाठी पुल, विज्ञानप्रेमी पुल, संगीतमय पुल, पुलंची भाषणे, त्यांच्या पुस्तकांची यादी असे सर्व वाचायला मिळते. गदिमांवरील www.gadima.com संकेतस्थळ मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असून ते दृकश्राव्य व लिखित स्वरुपात आहे. गदिमांवरील लघुपटापासून ते त्यांचे अजरामर गीतरामायण, जोगिया हा काव्यसंग्रह, चित्रपटातील गाणी, ललित लेखन याची माहिती मिळते. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यावरील
www.kusumagraj.org या संकेतस्थळावर त्यांचा जीवनपट, साहित्याची सूची, पुरस्कार, छायाचित्रे पाहायला मिळतात. रत्नाकर मतकरी यांच्या www.ratnakarmatkari.com या संकेतस्थळावर मतकरी यांनी आजवर लिहिलेली नाटके, बालनाटय़े, मालिका, त्यांचा परिचय, कथालेखन याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. गो. नि. दांडेकर यांच्यावरील www.goneeda.com हे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असल्याची नोंद संकेतस्थळाच्या पानावर देण्यात आली आहे. इंग्रजी भाषेतील साहित्य आणि साहित्यिकांच्या तुलनेत मराठीतील साहित्यिक कमी संख्येने इंटरनेटवर असले तरी ही चांगली सुरुवात असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींनी व्यक्त करण्यात येत आहे.

काहिली करणाऱा उन्हाळा सुसह्य
ढगाळ वातावरणाने काहिली करणारा उन्हाळा सुसह्य
मुंबई, २५ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अंगाची काहिली करणारा उन्हाळा मुंबईकरांसाठी थोडासा सुसह्य झाला. येत्या २४ तासातही मुंबई आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळलेले असेल, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळी मुंबईत ग्रॅण्टरोड व अन्य काही भागात तसेच ठाणे, डोंबिवली परिसरात काही क्षण पावसाचा शिडकावा झाला. या बाबत वेधशाळेकडे विचारणा केली असता, पावसाचा शिडकावा झाल्याची कोणतीही नोंद झाली नसल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. दिवसाच्या तापमानाची नोंद ३६ ते ३८ अंश सेल्सिअस पर्यत होत होती. मात्र आज अधूनमधून ढगाळ वातावरण असल्याने उन्हाळ्याच्या तडाखा थोडासा कमी झाला. आज सकाळी साडेआठवाजेपर्यंत कुलाबा येथे ३४.९ (कमाल) व २४.८ (किमान) तसेच सांताक्रूझ येथे ३७.१ (कमाल) व २४.९ (किमान) तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता ३४.५ व २४.८ इतक्या कमाल आणि किमान तापमानाची तर सांताक्रूझ येथे ३७.५ व २४.९ इतक्या कमाल व किमान तापमानाची नोंद झाली.

Thursday, April 23, 2009
प्रचार फेरीचा प्रवाह चालला हो
प्रचारफेरीचा प्रवाह चालला हो..!
सुरेश गंभीर (शिवसेना) -
भगवे झेंडे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले बिल्ले, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यां आणि तडतड वाजणारा ताशा.. हे चित्र असते दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्या प्रचारफेरीचे. बुधवारी सकाळी धारावीतील खांबदेवनगर, नव्वद फूट रस्ता परिसरातील शिवसेना शाखेपासून गंभीर यांच्या धारावीतील प्रचारफेरीला सुरुवात झालेली असते..
अरुंद गल्ल्या आणि एकमेकांना लागून असलेली घरे. सकाळची वेळ असल्याने जवळपास प्रत्येक गल्लीतील घराघरात पाणी भरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे अशी कामे चाललेली. गंभीर प्रत्येक घरापाशी जाऊन घरातील मंडळींना नमस्कार करतात तर महिला पदाधिकारी घरातल्यांना, तीस तारखेला मतदानाला या व धनुष्यबाण लक्षात ठेवा, अशी आठवण करून देतात. मुस्लिम वस्ती असलेल्या मदिना चाळ येथेही गंभीर यांचे उत्स्फूर्त स्वागत होते. पुढे गोपीनगर वसाहत, कुंचेकोरी समाज, भंडारी समाज, रामगुंफा, बसवेश्वर भाग येथून प्रचारफेरी पुढे सरकते. येथे एका मराठी भाषिक महिलेकडून गंभीर यांना औक्षण केले जाते. औक्षण केल्यानंतर पेढय़ाचा प्रसाद दिला जातो. हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा प्रसाद असल्याचे ती महिला सांगते. त्यावर गंभीर आणि कार्यकर्ते हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचाच आशिर्वाद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतात.
धारावीतील ढोरवाडा नंतर पुढे गांधीमैदानातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला गंभीर पुष्पहार अर्पण करतात. तेथे मुस्लिम समाजाकडून त्यांचे स्वागत केले जाते. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले सईद बक्कलवाला आघाडीवर असतात. धारावीतील शंकरकवडे चाळ, धारेश्वर शिवमंदिर आणि आजूबाजूचा परिसर पिंजून काढत प्रचारफेरी पुढे सरकते. धारावी शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेत मराठी भाषिकांबरोबरच तामिळ लोकांची संख्या खूप मोठी. त्यामुळे येथे सर्व घोषणा आणि मतदान करण्याचे आवाहन तामिळी भाषेत केले जाते. ‘विलंबू, विलंबू’ अशी घोषणेबाबत याचा अर्थ ‘धनुष्यबाण’ असल्याचे एक कार्यकर्ता स्पष्ट करतो. पुढे गजानन सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रीन पॅलेस या मोठय़ा इमारतींमध्ये गंभीर आणि त्यांचे सहकारी पोहोचतात. दुपारचा एक वाजायला आलेला असतो. प्रचारफेरी शेवटच्या टप्प्यात आलेली असते. महाराणा प्रताप सहकारी गृहनिर्माण संस्थेत गंभीर यांना औक्षण केले जाते. आता प्रचार संपलेला असतो. गंभीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तयारी सुरू असते ती दुपारनंतर धारावीच्या पुढील परिसरातील प्रचारफेरीच्या नियोजनाची..

कोमसापच्या साहित्य संमेलनात
कोमसाप’ साहित्य संमेलनात कार्यक्रमांची मेजवानी
मुंबई, २३ एप्रिल / प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे ११ वे कोकण मराठी साहित्य संमेलन येत्या ९ व १० मे रोजी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुलात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात विविध साहित्य विषयक कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर करणार असून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर समारोपास ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार शं. ना. नवरे व रामदास फुटाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
साप्ताहिक ‘लोकप्रभा’चे संपादक प्रवीण टोकेकर यांनी विश्वास पाटील यांच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीसह लोक साहित्यातील सासू-सुनेचे नाते बदलले आहे का, या विषयावर अनुभ कथन, ग्रंथदिंडी, आजच्या मराठी कवितेतील छंद हरवला आहे का, मराठीचिये बोली कवतिके, काव्यसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधींसाठी एका व्यक्तीकरता ८०० रुपये आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी प्रत्येकी ३०० रुपये असे शुल्क ठेवण्यात आले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९८६० ०१४ ३९२/९४२१ १३९ ४९० किंवा ०२३५७-२३५३५० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समग्र हिंदी साहित्य लवकरच इंटरनेटवर
समग्र हिंदी साहित्य आता लवकरच इंटरनेटवर!
प्रतिनिधी
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एक स्तुत्य उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने राबविण्याचे ठरवले असून या महत्वाकांक्षी प्रयोगामुळे हिंदी भाषेतील समग्र साहित्य आता लवकरच इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंग्रजी भाषेतील निवडक आणि दर्जेदार साहित्य क्लासिक रिडर डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असून येथे क्लिक केल्यानंतर इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखकांचे साहित्य वाचता येऊ शकते. इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेतील समग्र साहित्य भारतासह जगभरातील हिंदी साहित्य प्रेमींना वाचता यावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत समग्र हिंदी साहित्यातील सुमारे एक लाखांहून अधिक पाने इंटरनेटवर टाकण्यात येणार आहेत. यामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदी साहित्य प्रेमी आणि वाचक घरबसल्या एका क्लिकवर हिंदी साहित्यातील कथा, कवितांसह अन्य साहित्याचा आस्वाद घेऊ शकतील. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या ६६६.ँ्रल्ल्िर५्र२ँ६ं.१ॠ या संकेतस्थळावर हे हिंदी साहित्य वाचता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी दोन कोटी रुपये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आले आहेत. हिंदी भाषेतील ज्या लेखकांच्या साहित्यावरील स्वामीत्वधनाचा (कॉपीराईट)चा अधिकार संपुष्टात आला आहे, त्या लेखकांचे साहित्य प्रारंभी या संकेतस्थळावर देण्यात येणार असून अन्य हिंदी साहित्यिक आणि प्रकाशकांची परवानगी घेऊन त्यांचे साहित्यही येथे देण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र संपादक मंडळ नियुक्त करण्यात येणार असून या मंडळाकडून इंटरनेटवर जे साहित्य देण्यात येणार आहे, त्याची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पानंतर विविध परदेशी भाषांमध्येही निवडक हिंदी साहित्याचा अनुवाद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून यात इंग्रजीसह फ्रेंच, जर्मनी, इटालियन, रशियन, चीनी यांचा समावेश आहे.

Tuesday, April 21, 2009
मराठीत आता डिजिटल पुस्तके
मराठीत आता डिजिटल पुस्तके!
प्रतिनिधी
इंटरनेट आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड नेहमीच करण्यात येत असते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असले तरी त्याविषयी केवळ ओरड न करता संगणक, इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न ‘एमएमएस डिजीटल’ या कंपनीने केला आहे. त्यापैकी काही पुस्तके सीडी व ऑडिओ स्वरुपात प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके आणि मासिके आता थेट डिजीटल स्वरुपात इंटरनेटवरूनही सशुल्क डाऊनलोड करता येऊ शकतील. उत्कर्ष प्रकाशन आणि उत्कर्ष बुक सव्र्हीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
परदेशात असलेल्या मराठी मंडळींना थेट मराठी पुस्तके विकत घेता यावीत आणि त्यांच्यात मराठी वाचनाची आवड वाढावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील नेटसॅव्ही वाचक तसेच विद्यार्थी व तरुणांकडून इंटरनेटचा केला जाणारा वापर याचा विचार करून या पुस्तकांच्या सीडी आणि ऑडिओ सीडीही तयार करण्यात आल्या आहेत.
सध्या देवाघरचा पाऊस (रवींद्र पिंगे), गिरकी (मंगला गोडबोले) ही पुस्तके सीडी आणि ऑडिओ अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहेत. तर सुदाम्याचे पोहे (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर), समृद्धीच्या मार्गावर (आर. एम. लाला), ताजतवानं व मुद्रा (सुधीर गाडगीळ), अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक (डॉ. एम. कटककर), खरा तो एकची धर्म (प्रा. राम शेवाळकर), जाणता अजाणता, लेकुरवाळी व इतस्तत: (शांता शेळके), पांढऱ्यावर काळे (व्यंकटेश माडगूळकर) आदी पुस्तके सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उपलब्ध असलेली ही पुस्तके संगणकाच्या माध्यमातून वाचता आणि ऐकताही येणार आहेत. तर काही पुस्तके सशुल्कथेट इंटरनेटवरून डिजीटल स्वरुपात डाऊनलोड करून घेता येऊ शकतील.
या पुस्तकांसह मराठीतील माहेर, मेनका आणि विपुलश्री आदी मासिकेही डिजीटल स्वरुपात या कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत. सध्या तरी उत्कर्ष प्रकाशनाचीच पुस्तके या उपक्रमाअंतर्गत डिजीटल व सीडी स्वरुपात उपलब्ध असली तरी लवकरच अन्य प्रकाशकांचीही पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे उपक्रमाच्या प्रकाशन विभागाकडून सांगण्यात आले.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना ०२०-२५५३७९५८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा www.mmsdigital.com या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

मेघदूताचे अंतरंग
नेहरू सेंटरमध्ये उलगडणार ‘मेघदुता’चे अंतरंग!
मुंबई, २१ एप्रिल / प्रतिनिधी
संस्कृत महाकवी कालिदास यांनी रचलेल्या ‘मेघदूत’ या महाकाव्याला मराठी साहित्यात अनन्य साधारण स्थान असून मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या महाकाव्याचा मराठीत अनुवादही झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनीही या महाकाव्याचा अनुवाद केला असून येत्या १ मे रोजी मुंबईत या मेघदुताचे अंतरंग एका कार्यक्रमाद्वारे उलडणार आहे.
नेहरू सेंटरने सायंकाळी साडेसहा वाजता ‘मेघदूत एक महाकाव्य’ या नृत्यनाटिकेचे आयोजन केले आहे.या नृत्यनाटिकेबरोबरच कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन. मेघदूताची रचना करताना कालिदास यांनी ज्या ज्या परिसरावरून मार्गक्रमण केले तो केवळ कल्पनेचा भाग नव्हता हे आता सिद्ध झाले आहे. डॉ. एस. व्ही. भावे यांनी कालिदासाने ज्या मार्गाने प्रवास केला त्या रामगिरी पर्वत म्हणजेच आजचे रामटेक ते हिमालयातील अलकापुरी या मार्गाने विमान प्रवास करून ते सर्व वर्णन आणि प्रदेश खरा असल्याचे दाखवून दिले आहे. डॉ. भावे यांनी या प्रवासाची छायाचित्रे काढली असून त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाची संकल्पना एल. ए. काझी यांची असून सदानंद डबीर यांनी कार्यक्रम संहितेचे लेखन केले आहे. नृत्यनाटिकेचे दिग्दर्शन झेलम परांजपे यांचे तर संगीत आनंद मोडक यांचे आहे. ज्ञानेश पेंढारकर, माधुरी करमरकर, मंदार आपटे यांनी यातील गाणी गायली आहेत.

समग्र माहितीची ज्ञानगंगा
जग, भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र माहितीची ‘ज्ञानगंगा’!
प्रतिनिधी
जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि भौगोलिक विषयांसह अन्य अनेक विषयांची समग्र माहिती आता ‘ज्ञानगंगा’ या सीडीद्वारे उपलब्ध झाली आहे. शैलानी सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीने ही सीडी तयार केली असून गेल्या महिन्यात महाबळेश्वर येथे झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. या सीडीमध्ये जग, भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध छायाचित्रे आणि नकाशे देण्यात आले असून भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान, प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे कार्य, शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यटन, धर्म, भाषा, संगीत आदी विषयांची संपूर्ण माहिती यात देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्त्येक जिल्ह्याची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, तेथील हवामान यासह प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ०२०-४००५६५५४ किंवा ०२५६१-२२४९४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Monday, April 20, 2009
साहित्य संमेलन अवघ्या चाळीस लाखांत
महाबळेश्वर साहित्य संमेलन अवघ्या ४० लाखांत!
मुंबई, २० एप्रिल / प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे गेल्या महिन्यात ८२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग पार पडला. संमेलन आयोजनातील या नॅनो प्रयोगात आता ‘नॅनो’ खर्चाचीही नव्याने भर पडली आहे. गेल्या काही वर्षांतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात खूपच कमी खर्चात पार पडलेले साहित्य संमेलन म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनाची नोंद होणार आहे. या साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे चाळीस लाखांच्या घरात झाल्याचे संमेलन आयोजन समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. दरवर्षी भरणाऱ्या या साहित्य संमेलनांचा खर्च एक ते दोन कोटी रुपयांवर गेला होता. संमेलनांवर होणाऱ्या या वाढत्या खर्चाबाबत साहित्य क्षेत्रातील जाणकारांकडून काही प्रमाणात नाराजीही व्यक्त केली जात होती. संमेलनांवरील हा भरमसाठ खर्च, भपकेबाजपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे बोलले जात होते.
महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अनेक प्रकारांनी गाजले. त्यात संमेलनाला संमेलनाध्यक्षच नाही, संमेलनापूर्वी संमेलनाध्यक्षाने राजीनामा देणे, संमेलनाध्यक्षाच्या भाषणाच्या प्रती साहित्य रसिकांना न मिळणे आदी गोष्टींचा समावेश होता. त्यात आता गेल्या काही वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात कमी खर्चात झालेले साहित्य संमेलन म्हणून याची नोंद होणार आहे.
महाबळेश्वर हे प्रामुख्याने पर्यटन व्यवसायाचे शहर असल्याने तेथे आजवरच्या साहित्य संमेलनाला जशी गर्दी झाली, तशी होणार नाही, हे आम्ही गृहीत धरलेले होते. तरीही उद्घाटन सोहळ्याला किमान पाच हजार रसिक उपस्थित होते. तर प्रतिनिधी नोंदणी करून सुमारे बाराशे ते पंधराशे रसिक उपस्थित होते. संमेलनासाठी आलेले साहित्य रसिकांची तीन दिवसांचा निवास, चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आदी सर्व सोय केवळ बाराशे रुपयांत व ती ही चांगल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. हा सुद्धा महाबळेश्वर संमेलनाचा नवा पायंडा होता. कारण नावनोंदणी केलेल्या साहित्य रसिकांची सोय यापूर्वी शाळा-महाविद्यालयांच्या वर्गातून केली जात होती, असेही आयोजन समितीच्या अन्य एका सदस्याने सांगितले.
साहित्य संमेलनाच्या खर्चाचे सर्व हिशोब येत्या एक-दोन दिवसात अंतिम केले जाणार असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई, १९ एप्रिल / प्रतिनिधी
इंटरनेट आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड नेहमीच करण्यात येत असते. काही प्रमाणात त्यात तथ्यही असले तरी त्याविषयी केवळ ओरड न करता संगणक, इंटरनेटचा वापर करून विद्यार्थी आणि युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न ‘एमएमएस डिजिटल’ या कंपनीने केला आहे. त्यापैकी काही पुस्तके सीडी व ऑडिओ स्वरुपात प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके आणि मासिके आता थेट डिजिटल स्वरुपात इंटरनेटवरूनही सशुल्क डाऊनलोड करता येऊ शकतील. उत्कर्ष प्रकाशन आणि उत्कर्ष बुक सव्र्हीस यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
परदेशात असलेल्या मराठी मंडळींना थेट मराठी पुस्तके विकत घेता यावीत आणि त्यांच्यात मराठी वाचनाची आवड वाढावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असले तरी भारतातील आणि महाराष्ट्रातील नेटसॅव्ही वाचक तसेच विद्यार्थी व तरुणांकडून इंटरनेटचा केला जाणारा वापर याचा विचार करून या पुस्तकांच्या सीडी आणि ऑडिओ सीडीही तयार करण्यात आल्या आहेत.
सध्या देवाघरचा पाऊस (रवींद्र पिंगे), गिरकी (मंगला गोडबोले) ही पुस्तके सीडी आणि ऑडिओ अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहेत. तर समृद्धीच्या मार्गावर (आर. एम. लाला), ताजतवानं व मुद्रा (सुधीर गाडगीळ), अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक (डॉ. एम. कटककर), खरा तो एकची धर्म (प्रा. राम शेवाळकर), जाणता अजाणता, लेकुरवाळी व इतस्तत: (शांता शेळके), पांढऱ्यावर काळे (व्यंकटेश माडगूळकर) आदी पुस्तके सीडी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
उपलब्ध असलेली ही पुस्तके संगणकाच्या माध्यमातून वाचता आणि ऐकताही येणार आहेत. तर काही पुस्तके सशुल्कथेट इंटरनेटवरून डिजीटल स्वरुपात डाऊनलोड करून घेता येऊ शकतील. या पुस्तकांसह मराठीतील माहेर, मेनका आणि विपुलश्री आदी मासिकेही डिजीटल स्वरुपात या कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत. सध्या तरी उत्कर्ष प्रकाशनाचीच पुस्तके या उपक्रमाअंतर्गत डिजीटल व सीडी स्वरुपात उपलब्ध असली तरी लवकरच अन्य प्रकाशकांचीही पुस्तके उपलब्ध होणार असल्याचे उपक्रमाच्या प्रकाशन विभागाकडून सांगण्यात आले.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना ०२०-२५५३७९५८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा www.mmsdigital.com या संकेतस्थळावरही संपर्क साधता येईल.

लंडन बुक फेअर
लंडन बुक फेअर’मध्ये अवघ्या दोन मराठी प्रकाशकांचा सहभाग
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
जगभरातील प्रकाशक आणि साहित्यप्रेमी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘लंडन बुक फेअर’ मध्ये भारतातील सुमारे शंभर प्रकाशन संस्था सहभागी होत असून त्यात मराठीतील अवघ्या दोन प्रकाशकांचा समावेश आहे. येत्या २० ते २२ एप्रिल या कालावधीत लंडन येथे हा पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या बुकफेअरमध्ये भारताला विशेष अतिथी देश म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
इंग्रजी भाषेनंतर सर्वात जास्त पुस्तके प्रकाशित करणाऱ्या अमेरिका, इंग्लंड नंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात २३ हून अधिक भाषांमध्ये दरवर्षी सुमारे ८० हजार पुस्तके प्रकाशित होत असतात. त्यात हिंदी, बंगाली आणि अन्य काही प्रादेशिक भाषांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात प्रकाशित होत असतात. मराठीचा सहभाग हिंदूी आणि बंगाली भाषांच्या तुलनेत कमी असतो, ही वस्तुस्थिती आहे. लंडन बुक फेअर दरवर्षी आयोजित करण्यात येत असून जगभरातून हजारो पुस्तक प्रकाशक, विक्रेते, लेखक यात सहभागी होत असतात. मात्र मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांचा मात्र आजवर यात सहभाग नव्हता. यंदाच्या वर्षी मात्र पुणे येथील मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील व अनिल मेहता आणि नाशिकच्या करिअर पब्लिकेशन्सचे निषाद देशमुख हे यात सहभागी होत आहेत.
भारतात दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ८० हजार पुस्तकांमध्ये सुमारे १८ हजार पुस्तके ही इंग्रजी भाषेतील असतात. यंदाच्या लंडन बुक फेअरमध्ये अभिनव पब्लिशर्स, डायमंड पॉकेट बुक्स, साहित्य अकादमी, पुस्तक महल आणि अन्य प्रकाशक सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या पुस्तक महोत्सवात २१ एप्रिल रोजी भारतीय परंतू इंग्रजी भाषेत लिहिणारे लेखक विक्रम सेठ यांची ‘ऑथर ऑफ द डे’ म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच अमर्त्य सेन, गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती, तरुण तेजपाल, जावेद अख्तर आदी लेखकांनाही या पुस्तक महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील सुमारे १०९ देश यंदाच्या पुस्तक महोत्सवात सहभागी होणार आहेत.
मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, गेल्यावर्षीपर्यंत लंडन बुक फेअरमध्ये कोणीच मराठी प्रकाशक सहभागी होत नव्हते. यंदा मी, अनिल आणि नाशिकचे निषाद देशमुख १८ एप्रिल रोजी महोत्सवात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहोत. तीन दिवसांच्या महोत्सवात लेखकांची मुलाखत, पुस्तक प्रकाशन, काव्य वाचन, परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

वाचकच उदासीन
ललित’ चोखंदळ वाचकनिवडीसाठी वाचकच उदासीन!
मुंबई, १५ एप्रिल / प्रतिनिधी
‘ललित’ मासिकाकडून मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ या उपक्रमासाठी वाचकांनीच यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिला. मासिकातर्फे विविध क्षेत्रातील पाचशे जणांची निवड करून वाचलेल्या पुस्तकांपैकी आपली आवड कळविण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त १७३ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वाचक निवडीत मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ या पुस्तकाला सर्वाधिक म्हणजे २४ वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.
मराठीतील सुजाण आणि चोखंदळ वाचकांना एकमेकांच्या आवडीची कल्पना यावी आणि गेल्या वर्षभरात कोणती चांगली पुस्तके वाचली गेली, त्याची माहिती इतर वाचकांना व्हावी, या उद्देशाने १९६५ पासून म्हणजेच गेल्या ४३ वर्षांपासून चोखंदळ वाचकांची निवड हा उपक्रम ‘ललित’ मासिक राबवत आहे. २००८ या वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जी पुस्तके वाचली गेली व वाचकांना आवडली, त्याचा शोध घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्रातील पाचशे जणांना पत्र पाठवून पुस्तके कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चोखंदळ वाचकांकडून निवड करण्यात आलेली अन्य पुस्तके आणि ती निवड केलेल्या वाचकांची संख्या अशी - मॅजेस्टिक कोठावळे (१७), गंगा आए कहॉसे-मूळ लेखक-गुलजार, अनुवाद-विजय पाडळकर (१७), पाणीयावरी मकरी-प्रा. राम शेवाळकर (१६), त्या वर्षी- शांता गोखले (१३) मनश्री-सुमेध वडावाला-रिसबूड (१३), वारी-एक आनंदयात्रा-संदेश भंडारे (११), शांताराम पारितोषिक कथा (९), पुन्हा मर्ढेकर, संपादन-डॉ. विजया राजाध्यक्ष (९), गाथा इराणी-मीना प्रभू (११), सर्वोत्तम सरवटे-संपादन-अवधूत परळकर (९), रुजवात-डॉ. अशोक रा. केळकर, (९), कॉल आफ द सीज्-चंद्रमोहन कुलकर्णी(७), अल्पसंख्य-विजय पाडळकर (७), भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा, खंड १ व २- संपादिका-डॉ. मंदा खांडगे व डॉ. निलीमा गुंडी, डॉ. विद्या देवधर व डॉ. निशिकांत मिरजकर, (७), खुंदळघास-सदानंद देशमुख (८) आदी पुस्तकांचाही समावेश आहे.

दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून
मंदीचा तडाखा, त्यात उन्हाचा कडाका
थेट मतदारसंघातून (दक्षिण मध्य मुंबई)
शेखर जोशी / कैलास कोरडे
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या तारखेपूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचार समाप्त होतो. त्यामुळे मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील प्रचार २८ तारखेला सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल. प्रचार संपायला बरेच दिवस शिल्लक असले तरी मुंबईला अद्यापही निवडणूक ज्वर चढलेला दिसत नाही. हा मतदारसंघही त्यास अपवाद नाही. मुंबईतील पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील लोकसभा निवडणुकीचे वातावरण अद्याप तापले नसल्याचे दक्षिण मध्य मुंबईतही सर्वत्र ऐकायला मिळते. त्याची दोन कारणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाली. त्यापैकी एक म्हणजे आचारसंहितेमुळे पोस्टर व बॅनरबाजी पूर्णत: बंद झाली असून, गाडय़ांवर भोंगा लावून किंवा भिंती रंगवून वातावरणनिर्मितीचा जमाना राहिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे मंदीच्या तडाख्यामुळे आणि उन्हाच्या कडाक्यामुळे कार्यकर्त्यांचा निवडणूक प्रचारातील सहभाग घटला आहे. परिणामी ज्या भागात उमेदवार फिरत असतो, केवळ तेथेच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते. इतर वेळी अगदी पक्ष कार्यालयातही शुकशुकाट असतो.
येत्या दोन-तीन दिवसांत प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू होईल, असे माटुंगा येथील काँंग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने सांगितले. त्यामागील कारण विचारले असता तो म्हणाला की, आतापर्यंत केवळ तालुका पातळीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे कार्यकर्त्यांना प्रचारात उतरविण्यासाठी सुरू होते. एकदा का या कार्यकर्त्यांनी प्रचारात उडी घेतली की, निवडणूक प्रचारात आपोआप रंग भरलेले दिसतील. हे खरे असले तरी, याआधी झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद थंडच आहे. दक्षिण-मध्य मुंबईत सर्वच राजकीय पक्षांना हे जाणवत असले, तरी उघडउघड हे सत्य स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. खासगीत मात्र राजकीय पक्षांचे पदाधिकारी ही बाब मान्य करतात.
मतदारसंघांच्या फेररचनेमुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे क्षेत्रही बरेच विस्तारले आहे. दक्षिणेला एलिफिन्स्टन ब्रिजपासून सुरू होणाऱ्या या मतदारसंघात माहीम ते भक्ती पार्क पर्यंतचा शहर हद्दीतील भाग आहे. याखेरीज सुमन नगर ते घाटकोपर नाला आणि अणुशक्ती नगपर्यंत भाग तसेच पूर्व द्रूतगती महामार्गापासून ते माहूलपर्यंतचा भाग या मतदारसंघात आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करणे शक्य नाही. प्रत्येक इमारतीला भेट देणेही अशक्य आहे. परिणामी पुढील दहा-पंधरा दिवसांत पदयात्रा, रोड शो, जाहीर सभा आणि मेळावे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची ‘स्ट्रॅटेर्जी’ पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितली. याखेरीज झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ांमधील प्रभावशाली मंडळीशी बैठका करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून वातावरणनिर्मितीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात पक्षांच्या चिन्हांचे फलक, झेंडे, कार्यकर्त्यांसाठी टोप्या, मफलर आदींचे ढीग पडलेले दिसत आहेत. प्रत्येक पक्षाकडून कितीही जोरदार तयार असली तरी सर्वसामान्य मतदार अद्यपही गोंधळलेल्या स्थितीत आहेत. आपण कोणत्या मतदारसंघात मोडतो, हेही कित्येकांना ठाऊक नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे २००४ मध्ये असलेला उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदार संघ आता दक्षिण मध्य मुंबई झाला आहे. या मतदारसंघात माहीम, वडाळा, शीव-कोळीवाडा, अणुशक्तीनगर आणि चेंबूर असे पाच विधानसभा मतदार संघ येतात. या मतदार संघात विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), विद्यमान आमदार सुरेश गंभीर (शिवसेना) आणि श्वेता परुळकेर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अशी प्रमुख तिरंगी लढत होणार आहे. या प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा चेहरा वेगवेगळा आहे. मतदार संघांच्या या चेहऱ्याचा व तेथील विविधरंगी वातावरणाचा अनुभव येथे फेरफटका मारताना सहज जाणवतो. दादर, प्रभादेवी आणि माहीम परिसरात मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीयांची मोठय़ा प्रमाणात वस्ती आहे. मोठमोठे टॉवर्स, आलिशान बंगले आणि मोठय़ा संख्येतील सहकारी गृहनिर्माण संस्था, शासकीय, निमशासकीय आणि कॉर्पोरेट कार्यालये, शिवाजी पार्क याच मतदार संघात येतात.
गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजप युती आणि बहुजन समाज पक्ष यांच्या दोन मोठय़ा सभा येथे झाल्या. लालकृष्ण अडवाणी व मायावती या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या येथे सभा झाल्या. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना मुंबईतील निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी १९ आणि २६ एप्रिल असे दोन रविवार मिळणार आहेत. शिवसेना-भाजप युती, कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आणि मनसेसह अन्य सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी सध्या तरी प्रचाराचा सर्व भर हा घरोघरी फिरण्यावर आणि वैयक्तिक संपर्कावर दिला असल्याचे चित्र या मतदार संघात पाहायला मिळाले. चाळी, मोठमोठे टॉवर्स, सहकारी गृहनिर्माण संस्था येथे उमेदवार आणि त्याच्या बरोबरचे कार्यकर्ते फिरत आहेत. काहीजण रेल्वेस्थानक, भाजीमार्केट, महाविद्यालये येथे जाऊनही मतदारांना भेटत आहेत. ‘जसा मतदार तसा प्रचार’ असे सूत्र राजकीय पक्षांनी ठेवले आहे. राजकीय पक्षांच्या महिला शाखा, विद्यार्थी संघटना तसेच काही सामाजिक मंडळे, संस्था यांच्या माध्यमातूनही राजकीय पक्ष निवडणूक प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या मतदार संघात मोठय़ा प्रमाणात दलित, मुस्लिम व दक्षिण भारतीय मतदार असून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकाच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात असतात. अद्यापतरी अशा मोठय़ा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभा झाल्या नसल्या तरी शेवटच्या टप्प्यात त्याला अधिक जोर येईल. ‘मनसे’कडे मराठी नाटय़-चित्रपट व दूरदर्शन मालिकांमधील बरीच कलाकार मंडळी आहेत. मनसेच्या श्वेता परुळेकर यांच्या प्रचारासाठी या मंडळींना शेवटच्या टप्प्यात उतरवले जाईल, असे सांगण्यात येते. मतदार संघातील विविध राजकीय पक्ष कार्यालयांचा कानोसा घेतला असता निवडणुकीच्या तयारीबरोबरच त्या अनुषंगाने येणारी अन्य कामे करण्यात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्याचे काम यापूर्वीच झाले आहे. मतदार याद्यांची तपासणी, आपले किती मतदार त्या दिवशी येऊ शकतात, त्यांना मतदानाला कसे आणायचे, मतदारांचे नाव, मतदान केंद्र आदींचा तपशील काही वर्षांंपूर्वीपर्यंत हाताने लिहून कार्यकर्ते नेऊन द्यायचे. आता हे काम संगणकावर केले आहे. तरुण मतदारांवर एसएमएस तसेच ऑर्कूट आणि अन्य कम्युनिटीच्या माध्यमातून स्र्कॅपद्वारे आपले आवाहन कसे पोहोचवावे, यावरही चर्चा सुरू आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ऐन उन्हाळ्यात होणारी ही निवडणूक आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे मतदार गावी जाऊ नयेत म्हणून राजकीय पक्ष व त्यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी कशी करायची, त्याचीही स्ट्रॅटेजी कार्यालयातून आखली जात आहे.

कोसबाड टेकडी वार्तापत्र
कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची पारितोषिकासाठी निवड
मुंबई, १४ एप्रिल / प्रतिनिधी
कवी प्रफुल्लदत्त स्मारक समितीने दिलेल्या देणगीतून मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या कवी प्रफुल्लदत्त पारितोषिकासाठी ‘कोसबाड टेकडी वार्तापत्र’ची निवड करण्यात आली आहे. यंदाचा हा पुरस्कार ‘आदर्श व कुशल संपादक’ या गटासाठी देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी गिरिजा कीर व डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या परीक्षक समितीने ग्राम बाल शिक्षा केंद्र, कोसबाड टेकडी, तालुका-डहाणू, जिल्हा-ठाणे यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या या वार्तापत्राची निवड केली आहे.येत्या २५ एप्रिल रोजी मुंबई ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

शक्ती सामंता यांचे निधन
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे निधन
मुंबई, ९ एप्रिल / प्रतिनिधी
‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंता यांचे आज सायंकाळी सांताक्रूझ येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. सामंता यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. त्यात ३७ हिंदी , ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. प. बंगालमध्ये जन्मलेले सामंता कोलकाता विद्यापीठातून १९४४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता होण्याच्या उद्देशाने मुंबईत आले. रत्नागिरीजवळील दापोली येथे त्यांनी शिक्षक म्हणूनही काही काळ नोकरी केली. १९४८ मध्ये ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. १९५४ मध्ये सामंता यांनी ‘बहू’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर ‘इन्स्पेक्टर’, ‘शेरु’, ‘डिटेक्टीव्ह’ आदी चित्रपट दिग्दर्शित केले. पुढे १९५७ मध्ये त्यांनी स्वत:ची ‘शक्ती फिल्म’ ही कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीचा पहिला चित्रपट ‘हावडा ब्रिज’ हा होता. शक्ती सामंता यांनी ५० ते ६० च्या दशकात शम्मी कपूर, राजेश खन्ना यांच्यासमवेत काम केले. हावरा ब्रिज, कश्मीर की कली, अॅन इव्हीनिंग इन पॅरिस, अमानुष, बरसात की एक रात असे, इन्सान जाग उठा, एक राझ, अनुराग, अजनबी, मेहबुबा, अनुरोध, दि ग्रेट गॅम्बलर, अलग अलग असे अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.
सामंता यांना आराधना, अनुराग व अमानुष या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. झी टीव्हीतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

आगामी साहित्य संमेलन दिल्लीत
आगामी साहित्य संमेलन दिल्लीत?
दोन महिन्यांत निर्णय होणार
प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पुढच्या वर्षी संपत आहे. आगामी ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाले-पाटील यांच्याच अधिपत्याखाली पार पडणार असून ठाले-पाटील यांची कार्यपद्धती आणि राजकीय वजन पाहता हे संमेलन नवी दिल्लीतच होण्याची दाट शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० मध्ये जानेवारी महिन्यात होईल.
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. ८२ व्या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी, ठाणे, परभणी आदी ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. मात्र ठाले-पाटील यांनी हे ८२ वे मराठी साहित्य संमेलन सॅनहोजे येथे भरविण्याचा घाट घातला होता. त्यांच्या या निर्णयावर मराठी साहित्य आणि प्रकाशन वर्तुळातून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. तरीही ठाले-पाटील सॅनहोजे येथे संमेलन घेण्यावर ठाम होते. हे संमेलन सॅनहोजे येथे झाले असते तर ते महामंडळाच्या घटनेच्या विरोधात ठरले असते. याच्या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितली असती तर तांत्रिक मुद्दय़ावर हे संमेलन अडचणीतही येऊ शकले असते. त्यातच रत्नागिरीकरांनी पर्यायी साहित्य संमेलन घेण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे अखेर ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याची पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे राज्यात घेण्याचे ठाले-पाटील यांना जाहीर करावे लागले. मात्र या सगळ्या प्रकारात ठाले-पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेचा अपवाद वगळता अन्य घटक संस्था व संलग्न संस्थांनी ठाले-पाटील यांच्या हो ला हो म्हटले होते.
महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी पुढील साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाणे, पुणे, परभणी आणि नवी दिल्ली येथून आमंत्रणे आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. ८२ वे साहित्य संमेलन भरविण्यासाठाही ठाणे, पुणे, रत्नागिरी, परभणी यांनी आमंत्रण दिले होते. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन हे या पैकी एखाद्या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा आहे.ज्या ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत, त्या त्या ठिकाणी महामंडळाची समिती भेट देते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येतो. मात्र ठाले-पाटील आपले राजकीय वजन आणि प्रतिष्ठा वापरून हे संमेलन दिल्लीतच घेण्याचा तसेच महामंडळ अध्यक्षपदाच्या आपल्या कारकीर्दीतील अखेरचे साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करून आपले वर्चस्व दाखविण्याचा ठाले-पाटील प्रयत्न करतील, अशी चर्चा मराठी साहित्य क्षेत्रात रंगली आहे.

आम्ही मराठी संस्थेचे आवाहन
‘मराठी बोलता येणाऱ्या उमेदवारालाच निवडणुकीत मतदान करा’
‘आम्ही मराठी’ संस्थेचे मराठी नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत विशिष्ट उमेदवाराला मत देताना राजकीय बांधिलकी न बघता, आपल्या मातीशी बांधिलकी हा निकष ठरवावा, आणि त्यातही त्या उमेदवाराला मराठी बोलता येणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असणाऱ्या ‘आम्ही मराठी’ या संघटनेने समस्त मराठी नागरिक आणि मराठी बोलता येणाऱ्या जनतेला केले आहे. ‘अवघा मराठी तितुका मेळवावा’ असे घोषवाक्य असले तरी ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ ही आपली कृती असल्याचा इशाराही संघटनेचे कार्याध्यक्ष एकनाथ ताबवेकर व प्रवर्तक संजय भिडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
अठरा वर्षे वयावरील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय जबाबदारी म्हणून स्वत: मतदान करावेच पण इतरांनाही मतदान करण्यास उद्युक्त करावे, आपापल्या मतदार संघातील सर्व उमेदवारांचा साकल्याने विचार करून त्यातल्या त्यात जो उमेदवार स्वच्छ असेल त्याला मतदान करावे, मतदान होत असताना पैसे किंवा वस्तूंचे वाटप, बोगस मतदान आदी अपप्रवृत्तीना आळा घालावा आणि अशा घटनांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, उमेदवार ठरवताना जातीय, धार्मिक, आर्थिक निकष व नातीगोती टाळावी. केवळ शिक्षण आणि गुणवत्ता याच निकषांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे.
केवळ धर्म जनतेला बांधून ठेवू शकत नाही, मात्र भाषा बांधून ठेवू शकते, हे आधुनिक इतिहासातील सत्य बांगलादेशच्या निर्मितीमुळे सिद्ध झाले आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनीही सामाजिक सुधारणेचा वसा घेतला होता, मग महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने त्यांचे नाव का घेतले जात नाही, असा सवाल करून या पत्रकात पुढे म्हटले आहे की, जातीभेदाच्या पुढे जाऊन आणि आरक्षणाच्या मायाजाळात न अडकता नैतिक, आर्थिक, बौद्धिक निकषांच्या पायावर ‘आम्ही मराठी’ ने कामाला सुरुवात केली आहे.
नुकत्याच साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थेचा दुसरा वर्धापनदिन साजरा झाला. या निमित्ताने संस्थेने मराठी लोकांची निष्क्रीय व पराभूत मानसिकता बदलणे, दिल्लीपुढे हुजरेगिरी करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालणे, मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धन करणे आदींसाठी काम करण्याचे ठरवले असल्याचेही पत्रकाच्या अखेरीस म्हटले आहे.

पुस्तक प्रकाशक व ग्रंथविक्रेत्यांची अपेक्षा
पुस्तक विक्रीच्या ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणाला बसलेली खीळ दुर्लक्षित करण्यासारखी नाही
पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांची अपेक्षा
प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडलेले ८२ वे साहित्य संमेलन विविध वाद, प्रतिवाद आणि अन्य कारणांमुळे गाजले. महाबळेश्वरची लोकसंख्या सुमारे १२ ते १४ हजार इतकी असून हे शहर प्रामुख्याने पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांच्या तुलनेत येथे साहित्य रसिकांचा प्रतिसाद कमी असेल, हे गृहीतच होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही संमेलनापूर्वी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाकडे आम्ही एक प्रयोग म्हणून पाहतो आहोत’ असे सांगितले होते. त्यानंतर जे जे काही झाले त्यामुळे एकप्रकारे हे साहित्य संमेलन हा प्रयोगच ठरला आहे.
गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीने एक नवा उच्चांक गाठला होता. येथे साडेतीन ते चार कोटींची पुस्तक विक्री झाली होती. अर्थात येथे पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठीही दररोज हजारो लोकांच्या झुंडी येत होत्या. गेल्या काही वर्षांत सोलापूर, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात काही कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती. साहित्य संमेलन आणि पुस्तकप्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या मोठय़ा गर्दीचा फायदा पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना मिळाला होता. सांगली येथील साहित्य संमेलनात तर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे साडेतीनशे स्टॉल होते. महाबळेश्वर येथील संमेलनात ही संख्या सुमारे ८५ ते ९० इतकी कमी होती. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनात २० ते २५ टक्के पुस्तक विक्री झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत पुस्तक विक्रीची जी कोटीच्या कोटी उड्डाणे होत होती, त्याला महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर येथे साहित्य संमेलन घेण्याच्या प्रयोगामुळे गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीचा जो चढता आलेख होता, तो एका फटक्यात खाली उतरला असल्याचे प्रातिनिधिक मत महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्याने पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे रमेश राठीवडेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. महाबळेश्वरला आलेले प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनीही याला दुजोरा दिला. छोटय़ा गावात संमेलन घेतल्यामुळे तेथील वाचकांपर्यत हजारो पुस्तके एकाच वेळी पोहोचत असली तरी पुस्तक विक्रीसाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे या मंडळींचे म्हणणे आहे.

भावगीतगायनातील युगपुरुष हरपला
भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला!
मुंबई, २ एप्रिल / प्रतिनिधी
गजाननराव वाटवे यांच्या निधनाने मराठी भावगीतगायनातील ‘युगपुरुष’ हरपला असल्याची भावना संगीतप्रेमी आणि भावसंगीत विश्वात व्यक्त करण्यात येत आहे. वाटवे यांनी मराठी भावगीतांचा पाया घातला आणि ठिकठिकाणी भावगीत गायनाचे कार्यक्रम करून ती रसिकांपर्यंत पोहोचवली. मराठी भावसंगीत लोकप्रिय करण्यात वाटवे यांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रियाही या मान्यवरांनी व्यक्त केली.
यशवंत देव - गजाननराव वाटवे यांच्या निधनाने भावगीतांमधील युगपुरुष हरपला आहे. वाटवे हे कवितेतील, गीतातील भावाला शरण जाऊन गात असत. त्यामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या केवळ ओठावर न राहता थेट हृदयापर्यंत पोहोचत असे. भावगीतांमध्येही त्यांनी अनेक प्रयोग केले. अनेक कवितासंग्रह वाचून ते स्वत: गाण्यांची निवड करत आणि चाल लावून ती गात असत. मी लहान असल्यापासून त्यांचे गाणे ऐकत आलो आहे.
अरुण दाते - भावगीत हा गाण्याचा प्रकार म्हणून ज्यांनी लोकप्रिय केला व त्याला प्रसिद्धी मिळवून दिली, असे गजाननराव वाटवे भावगीतांचे जनक होते. वाटवे यांची अनेक भावगीते त्याकाळी लोकप्रिय झाली आणि आजही आहेत. वाटवे हे पुण्यात कार्यक्रम करायचे तेव्हा पुण्यातील रस्ते रसिकांच्या गर्दीने फुलून जायचे.
मंगेश पाडगावकर - भावगीत गायनाच्या क्षेत्रातील ऋषितुल्य कलावंत, असेच वाटवे यांचे वर्णन करावे लागेल. माझ्या वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी वाटवे यांनी आपल्या गायनाने आम्हाला वेडे केले होते. त्यांच्या ‘वारा फोफावला, दर्या उफाळला’ या गाण्याने आमच्या पिढीला भारून टाकले होते. त्या वयात गणेशोत्सवात खच्चून गर्दीत दोन-दोन तास उभे राहून त्यांच्या गाण्यांचे कार्यक्रम आम्ही ऐकले आहेत. वाटवे यांनी भावगीत गायनाची एक परंपरा निर्माण केली. कवितांची उत्तम जाण, शब्दांचे स्पष्ट व भावपूर्ण उच्चार, गोड व सुरेल आवाज, नाटकीपणा न करता कवितेतील नाटय़ व्यक्त करण्याची सहजता हे वाटवे यांच्या गायनाचे वैशिष्टय़ होते. त्यांनी निर्माण केलेल्या परंपरेत अनेक गायक वाढले. त्यांचे सूर व त्यांच्या स्वररचना मनात घोळवत त्यांचे स्मरण करणे हेच आता शक्य आहे.
गोविंद पोवळे - वाटवे हे सुगमसंगीत आणि भावगीतामधील अढळ ध्रुवतारा होते. जोपर्यंत मराठी संगीत कायम आहे तोपर्यंत वाटवे यांचे नाव आणि त्यांची गाणी रसिकांच्या मनात कायम घर करून राहतील.
विनायक जोशी - मराठी भावगीतांचा ‘सायंतारा’ आता कायमचा लोपला. भावगीत हाच त्यांचा श्वासोच्छवास होता. वाटवे हे भावगीतामधील ‘ताजमहाल’ होते.

ठाल्यांची ठोकशाही
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनमानी आणि ठोकशाही कारभारामुळे महामंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सॅनहोजे येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाले-पाटील यांनी जो आटापिटा केला आणि त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भरविण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच झाले पाहिजे. भारताबाहेर साहित्य संमेलन भरवायचे असेल तर त्यासाठी महामंडळाच्या घटनेत बदल करणे गरजेचे होते. मात्र ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे ८२ वे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला. विदर्भ साहित्य संघ आणि महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता याला कोणी विरोधही केला नाही. अखेर वृत्तपत्रे व साहित्य वर्तुळातून प्रखर टीका झाल्यानंतर ठाले यांनी नमते घेतले आणि सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होईल, अशी पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातच घेण्यास ते राजी झाले.
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे संमेलनाध्यक्षांशिवाय पार पडले.
आजवर झालेल्या साहित्य संमेलनांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. आणि त्यालाही ठाले-पाटील यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यांनी अगोदर खबरदारी घेऊन काही उपाययोजना केली असती तर अध्यक्ष निवडीचा पेच आणि संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलन पार पडणे या गोष्टी टाळता आल्या असत्या. डॉ. यादव यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी, त्यातील तुकाराम यांच्याविषयी असलेला वादग्रस्त मजकूर, त्यावर वारकरी संप्रदायाकडून उमटलेली प्रतिक्रिया, डॉ. यादव यांचा राजीनामा, डॉ. यादव अध्यक्ष असतील तर हे संमेलन होऊ न देण्याचा इशारा आदी सर्व बाबी काही एका दिवसात घडल्या नाहीत. संमेलनाच्या अगोदर किमान पंधरा ते वीस दिवस हा गदारोळ सुरू होता. त्यामुळे भविष्यात असाधारण परिस्थिती उद्भवली तर काय करायचे, त्यातून कसा तोडगा काढायचा याविषयी ठाले-पाटील यांना अगोदरच पूर्वतयारी करता आली असती. आपल्या घरातही एखादे लग्नकार्य किंवा तत्सम मोठा समारंभ असेल तर सर्वसामान्य माणूसही काही अडचण निर्माण झाली तर काय करायचे, त्याचा विचार करून पूर्वनियोजन करतो. साहित्य संमेलनासारख्या इतक्या मोठय़ा कार्यक्रमासाठी ठाले-पाटील यांनी ही खबरदारी का घेतली नाही, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तसेच महामंडळाच्या घटनेनुसार संमेलन मार्गदर्शन समितीची बैठकही का बोलावली नाही, असे सवाल विचारण्यात येत आहेत. महामंडळाच्या घटनेनुसार (परिशिष्ट-अ, नियम-१२) साहित्य संमेलनाच्या कार्याचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन समिती असते. संमेलनाची निमंत्रक संस्था, आयोजक यांना साहित्य संमेलनाच्या बाबतीत ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तर बोलावलीच नाही पण मार्गदर्शन समितीची बैठकही घेतली नाही. या प्रकाराला महाराष्ट्र साहित्य परिषदही तितकीच जबाबदार आहे. हा सर्व वाद सुरू असताना संमेलन निमंत्रक म्हणून महामंडळाची किंवा मार्गदर्शन समितीची बैठक बोलावण्याचा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसाच प्रकार डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती वितरित न करण्याबाबत ठाले-पाटील यांच्याकडून घडला. महामंडळाच्या घटनेत संमेलन प्रतिनिधींचे अधिकार असे एक प्रकरण आहे. त्यानुसार संमेलनाच्या खुल्या अधिवेशनातील ठरावांवर मत देणे, संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, अध्यक्षीय भाषण आणि अन्य साहित्य मिळणे हा संमेलनासाठी शुल्क भरून नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रतिनिधींचा अधिकार आहे. ठाले-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अध्यक्षीय भाषणाची प्रत संमेलनासाठी आलेल्या प्रतिनिधींना न देऊन महामंडळाच्या घटनेचीही पायमल्ली केली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी होणारे खुले अधिवेशन आणि ठरावांचे वाचन हे संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच झाले पाहिजे, असे महामंडळाची घटना सांगते. मात्र येथे संमेलनाध्यक्ष नसूनही ठरावांचे वाचन केले गेले. त्यामुळे ते ठरावही वैध ठरत नाहीत.
सांगली येथील ८१ व्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करून ठाले-पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनातही उद्घाटन सोहळ्यात त्यांनी अशीच काही मुक्ताफळे उधळली होती. संमेलनास उपस्थित असलेले प्रतिनिधी आणि वृत्तपत्रातून त्यावर टीका झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ठाले-पाटील यांनी त्या भाषणातील मते आणि विचार हे आपले स्वत:चे असून ते महामंडळाचे नाहीत, अशी सारवासारव केली. महामंडळाच्या सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि अपवाद वगळता महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे ठाले-पाटील यांच्या या मनमानी आणि घटनाविरोधी वागण्याला समर्थन देण्याचे आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर होण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
शेखर जोशी

रेड एफएमने जाहीर केले ‘बजाते रहो’ पुरस्कार
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
श्रोत्यांनी दिलेली पसंती आणि व्यक्त केलेल्या मतांवर आधारीत रेड एफएमचे ‘बजाते रहो’ हे आगळे पुरस्कार शुक्रवारी मुंबईत जाहीर करण्यात आले. बॉलीवूड, संगीत, क्रिकेट, टीव्ही आदी विविध क्षेत्रांसाठी रेड एफएमने हे आगळे पुरस्कार दिले.
बॉलीवूडकी दुनिया से या गटात ‘सुपर पीट फिल्म पुरस्कार’ द्रोणा या चित्रपटाला तर ‘बाप का नाम डुबो दिया’ पुरस्कार हरमन बावेजा याला जाहीर झाला. मयुर पुरी आणि बिमल ओबेराय यांना सिंग इज किंग या चित्रपटातील तुझे घोडी. या गाण्यासाठी ‘इस साल के या गाण्यासाठी जाहीर झाला.
प्रीतम याला ‘सबसे ज्यादा मेहनत करनेवाला संगीतकार’ हा पुरस्कार जाहीर झाला. अन्य जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे
क्रिकेट- बेस्ट ऑन फिल्ड ड्रामेबाज पुरस्कार-हरभजन सिंह (श्रीनाथ को सेरआम कान के नीचे बजाने के लिए), क्रिकेट गया तेल लेने पुरस्कार-विजय मल्ल्या (चिअर लेडी ना क्रिकेटर्स पेक्षा जास्त महत्व दिले म्हणून), मुंबईची शान-काम चालू आहे पुरस्कार- वांद्रे-वरळी सी िलक, ये जज्ज कैसे बन गया पुरस्कार-पायल रोहटगी (‘बिगबॉस’ मधील संभावना सेठ च्या कॅरेक्टरबाबत)
दिल्ली की शान आणि कोलकाता की शान साठी अनुक्रमे ब्ल्यु लाईन बस व बस ड्रायव्हर यांना जाहीर झाले.

लोकसत्याच्या ब्लॉगला वाचकांकडून
लोकसत्ता’च्या ब्लॉगला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई, २८ मार्च / प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचा आवाज जगभरात पोहोचविण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ब्लॉगला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतातील राजकीय पक्ष आणि राजकारणी यांच्याविषयी ब्लॉगवर नोंदल्या गेलेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाच्या आहेत. सर्व वाचकांनी ‘लोकसत्ता’ने अशा प्रकारचा ब्लॉग सुरू करून आपले मत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन केले आहे.
अॅड. शिरीष देशपांडे, रवी सोळुंके, व्ही. सतीश, मरकड मैत्रेय, अविनाश, राम गोगटे, योगेश नेने, राहुल जाधव, श्रीकांत लेले आणि असंख्य वाचकांनी ब्लॉगच्या संकल्पनेचे स्वागत केले असून हा एक चांगला उपक्रम आहे.
यातून जनमानसाची ताकद नक्कीच समजून येईल, असा विश्वासही काही जणांनी व्यक्त केला आहे. विनित पुणेकर यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणावर भाष्य करणारे खास सदर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर विवेक जोशी यांनी ‘लोकसत्ता’ची ‘इंडियन पोलिटिकल लीग’ही लिंक निवडणूक आणि राजकीय विषयावरील भरपूर बातम्या देणारी साईट असल्याचे म्हटले आहे. नवी दिल्ली येथील अनय जोगळेकर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
मतदारांनी पहिल्यांदा उमेदवार कोण आहे ते पाहावे आणि त्यानंतरच विचार करून आपले मत द्यावे, असे आवाहन हेमंत कोठावडे यांनी केले आहे, तर राजेंद्र नंदा यांनी देशात त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येऊ नये म्हणून दोनच राजकीय पक्ष असावेत, अशी सूचना केली आहे.
नरेंद्र प्रभू यांनी म्हटले आहे की, लोकसभेत आपणच निवडून दिलेले खासदार असभ्य वर्तन करताना, गोंधळ घालताना दिसतात. भ्रष्ट किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आता तरी निवडून देता कामा नये. खासदारकी ही कुणाची मिरासदारी ठरू नये. राजकारण्यांना निवृत्तीचे वय नाही, त्यामुळे आता आपणच ते ठरवून त्यांना निवृत्त केले पाहिजे. तर प्रदीप यांनी, आज सर्वच पक्ष भ्रष्टाचारी झाले असून डावे-उजवे करणे कठीण काम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
स्मिता सोनावणे यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असून कॉंग्रेस पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी सूचना केली आहे. प्रशांत आगलावे म्हणतात की, ‘आयपीएल’चे क्रिकेट सामने आता भारताबाहेर होणार असल्याने ज्यांची ऐपत आहे ते लोक मतदानाचे कर्तव्य बाजूला ठेवून आफ्रिकेत क्रिकेट पाहायला जातील.
मग देशाचे वाटेल ते होवो, यांना काय? ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर ‘इंडियन पोलिटिकल लीग’ ही िलक असून त्यावर क्लिक केल्यावर निवडणुकी संदर्भातील बातम्या, लेख पाहता येतात. तिथे असलेल्या ‘ब्लॉग नोंदवा’ या बटनावर क्लिक केल्यास थेट ब्लॉग ओपन होऊन वाचकांना त्यावर आपली प्रतिक्रिया थेट नोंदवता येते. ‘लोकसत्ता डॉटकॉम’ हे संकेतस्थळ युनिकोडमध्ये असल्याने त्यावर आता थेट मायमराठीत लिहिता येणार आहे.

ठरावांना घटनात्मक वैधता नाही
संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मंजूर
झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नाही
शेखर जोशी
मुंबई, २४ मार्च
महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी खुल्या अधिवेशनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसह विविध ठराव मंजूर करण्यात आले. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार खुले अधिवेशन हे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होत असते. या संमेलनाला अध्यक्षच नसल्याने मंजूर झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एक उपचार म्हणून हे विविध ठराव दरवर्षी मंजूर केले जातात. त्यासाठी महामंडळाच्या विषय नियामक समितीची बैठक होऊन त्यात खुल्या अधिवेशनात जे ठराव घेण्यात येणार आहेत, त्यावर चर्चा होते. मात्र महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात विषय नियामक समितीची रचनाच पूर्ण झाली नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या ठरावांना काहीच अर्थ उरत नाही. महामंडळाच्या घटनेनुसार साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष, घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी, संमेलनाच्या महाकोशाचे विश्वस्त, संमेलनाध्यक्षांनी नियुक्त केलेले पाच सदस्य, महामंडळाचे सर्व पदाधिकारी आदी सर्व मंडळी विषय नियामक समितीच्या बैठकीला उपस्थित असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या घटक व संलग्न संस्थांकडून जे ठराव संमेलनापूर्वी महामंडळाकडे आलेले असतात, त्यावर विषय नियामक समितीच्या बैठकीत चर्चा होऊन ठरावांना अंतिम रूप दिले जाते.
महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे भाषण संमेलनात वाचून न दाखविण्याचा आणि त्याच्या प्रती न वाटण्याचे ठरविण्यात आले. राजीनामा स्थगित ठेवण्यात आल्याने त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य गोष्टीही केल्या जाणार नसल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले होते. भाषण वाचून न दाखवणे आणि प्रती न वाटणे हे जर केले गेले नाही तर जे खुले अधिवेशन संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते आणि त्यात संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठरावांचे वाचन आणि त्याला मंजुरी ही प्रक्रिया तरी का पार पाडण्यात आली, भाषण वितरित न करणे किंवा त्याचे वाचन न करणे या प्रमाणे ठराव मंजूर करण्याची प्रक्रियाही स्थगित का नाही ठेवली, असा सवाल या सूत्रांनी उपस्थित केला. त्यामुळेच महामंडळाच्या घटनेनुसार मंजूर झालेले ठराव अवैध ठरतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

संमेलनाटे सूप वाजले
समारोपाला अत्यल्प उपस्थिती ; संमेलनाचे सूप वाजले
सुनील माळी, शेखर जोशी, गणाधीश प्रभुदेसाई, अवधूत डोंगरे
महाबळेश्वर, २२ मार्च
सातारा जिल्ह्य़ातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार, ठराव, मनोगत, ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम पाटील यांचा विशेष सत्कार आदी कार्यक्रमांनी ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. रविवार असूनही स्थानिक लोकांनी निरोप समारंभाकडे पाठ फिरविल्याने अत्यंत कमी उपस्थितांसमोर अखेर संमेलनाचे सूप वाजले. मान्यवरांची अनुपस्थिती व सत्कार समारंभ लांबल्यामुळे हा समारोप समारंभ आतापर्यंतच्या संमेलनांच्या समारोप समारंभांइतका दर्जेदार झाला नसल्याचे जाणवले.
कवितेच्या साधकाचा सन्मान
ग्रामीण भागामध्ये कवितेचा व्रतस्थपणे प्रसार करणारे साधक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचा हृद्य सत्कार संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ठाले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा.पाटील म्हणाले, ‘८२ व्या साहित्य संमेलनात हा ८२ वर्षांचा वृद्ध युवक आपल्यासमोर उभा आहे तो आभार मानण्यासाठी. १८८८ मध्ये नारायण नरहर फडणीस यांनी ‘काव्यरत्नावली’ या नावाचे मासिक सुरू केले. त्या मोठय़ा पावलावर पाऊल टाकून मी २४ वर्षांपूर्वी कवितेच्या प्रसारासाठी ‘कवितारथी’ हे द्वैमासिक खानदेशातून सुरू केले. त्याचे प्रकाशन रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याला अनेकांनी साथ दिली. महाराष्ट्राच्या उत्तर टोकाला बसून मी माझे काम केले. हे काम कायम सुरू ठेवावे, असा कुसुमाग्रजांनीही निरोप पाठविला होता. कवितेविषयीची आस्था, प्रेम ग्रामीण भागातही पाहायला मिळाले. जुन्या कवींबरोबरच नव्या कवींनाही त्यात मी स्थान दिले. कुसुमाग्रज यांच्यावर मी तीन विशेषांक प्रकाशित केले. त्यातील दोन विशेषांक हे कुसुमाग्रज हयात असताना प्रसिद्ध करण्यात आले होते. सीमेवरील जवान, नक्षलवादी भागातील जनताही त्याचे वर्गणीदार आहेत. ‘कवितेचे फुलपाखरू बंदुकीच्या नळीवर आणून ठेवलंय!’ असे त्याचे वर्णन करण्यात आले. माझे दिवस थोडे राहिले असून, मी निराशावादी नाही, असे म्हणत प्रा. पाटील यांनी, बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती ऐकवल्या. प्रा. पाटील यांच्याप्रमाणेच ‘ग्रंथाली’चे संस्थापक दिनकर गांगल यांचाही सत्कार करण्यात येणार होता. मात्र गांगल हे कार्यक्रमास अनुपस्थित होते.
समारोप समारंभात प्रास्ताविक करताना स्वागत समितीचे उपाध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी संयोजन समितीच्या वतीने मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचा जाहीर निषेध केला. समारोप समारंभासाठी नियोजन बैठक सुरू असताना मेहता आत येऊन आरोप करू लागले. या वेळी त्यांना कोणीही धक्काबुक्की केलेली नाही. त्यांनी प्रसारमाध्यमाकडे खोटी माहिती देऊन संमेलनलाच गालबोट लावल्याचा आरोप प्रा. बावळेकर यांनी केला.
पुस्तकांच्या प्रत्येक दालनासाठी चार हजार रुपये खर्च आलेला आहे. तरीही संयोजन समितीने दीड हजार रुपयांचे नुकसान सोसून प्रकाशकांना अडीच हजार रुपयांना दालन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे प्रकाशकांना जास्त भाडे आकारण्याच्या सुनील मेहता यांच्या आरोपातही काही तथ्य नसल्याचे बावळेकर म्हणाले.
स्मरणिकेत मावळते अध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांचे छायाचित्र नसल्याबद्दल खुलासा करताना बावळेकर म्हणाले की, स्मरणिकेसाठी आपले छायाचित्र व लेख पाठवून द्यावा, असे पत्र हातकणंगलेकर यांना पाठविले होते. पण हातकणंगलेकर यांनी समितीला पत्र पाठवून लेख पाठवू शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. हे सांगताना बावळेकर यांनी हातकणंगलेकर यांचे पत्र वाचून दाखविले.
संयोजकांकडून दिलगिरी
सातारा जिल्ह्य़ातील साहित्य संस्था व साहित्यिकांना संमेलनाच्या नियोजनात सहभागी न केल्याची तक्रार आल्यानंतर समारोप समारंभाच्या सुरुवातीलाच संयोजकांच्या वतीने मोहन कुलकर्णी यांनी दिलगिरी व्यक्त केली.
पुस्तक प्रकाशन
समारोप समारंभात ज्येष्ठ कवी पुरुषोत्तम पाटील व कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते मोहन पुराणिक, डॉ. सुमन नवलकर, अशोक गारडे, प्रवीण मेहता, वामनराव आवळे, तसेच आध्यात्म विद्यापीठाच्या एका पाठय़पुस्तकातील ग्रंथाचे व सनातन संस्थेच्या ‘मराठीवरील आक्रमणे आणि तिची दुर्दशा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. शालिनी सॉफ्टवेअरने काढलेल्या ‘ज्ञानगंगा’ या सीडीचे प्रकाशन या वेळी झाले.
साताऱ्यातील कर्तबगार व्यक्तींचा सत्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सातारा जिल्ह्य़ातील कर्तबगार व्यक्तींचा समारोप समारंभात सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अरुण गोडबोले, जगन्नाथ शिंदे, राजेंद्र माने, विश्वास दांडेकर, शंकर सारडा, मधुकर नेने, किशोर बेडकीहाळ आदींचा समावेश होता.
प्रतिनिधींचे मनोगत
डॉ. आनंद यादव यांची ‘संतसूर्य’ कादंबरी प्रकाशित करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसची नोंदणी पुणे महापालिकेने रद्द करावी, अशी मागणी प्रतिनिधींच्या वतीने बोलताना किसन कुऱ्हाडे यांनी केली व वारकऱ्यांच्या भूमिकेवरही टीका केली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी
निषेध!!!
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात ठराव
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २२ मार्च
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम समाजातील काही बाह्य़शक्ती करत असून, त्यामुळे व्यक्ती, संस्था आणि समाजाचे खच्चीकरण होत आहे, असे सांगतानाच लेखक-प्रकाशकांनीही आपल्या सामाजिक बांधीलकीचे भान ठेवावे, असा ठराव ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आज झालेल्या समारोपाच्या सत्रात मंजूर करण्यात आला. ठरावातील लेखकांबाबतचा मजकूर म्हणजे खुद्द अखिल भारतीय साहित्य महामंडळानेच या संमेलनाचे राजीनामा दिलेले अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याचे मानले जात आहे.
डॉ. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या पुस्तकातील काही वाक्यांवरून निर्माण झालेला गदारोळ, वारकरी संप्रदायाची आक्रमक भूमिका, डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा असे विविध प्रश्न निर्माण होऊन हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
‘८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर घडलेल्या काही घटना व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या होत्या. या घटना व्यक्ती, संस्था व समाजाचे मनोबल खच्ची करणाऱ्या असून, विशिष्ट गटाचे संघटित बल गैरमार्गाने वापरून ते समाजाचे विघटन करणारे आहे. हे संमेलन अशा प्रवृत्तींचा निषेध करत आहे. मात्र त्याचवेळी लेखक-प्रकाशक यांनीही सामाजिक बांधीलकीचे भान ठेवावे. सर्वाना स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी राज्य शासनाने अशा प्रकरणी कार्यवाही करून योग्य ती उपाययोजना करावी,’ असा ठराव मंजूर करण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील हे या ठरावाचे सूचक असून, आनंद परांजपे हे अनुमोदक आहेत.

साहित्यिकांनी लक्ष्णरेषा सांभाळावी
साहित्यिकांनी लक्ष्मणरेषा सांभाळावी - अभ्यंकर
शेखर जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्यनगरी, महाबळेश्वर, २१ मार्च
संत रामदास स्वामी यांनी सांगितलेल्या ‘अभ्यासोनी प्रकटावे’ या ओवीची आठवण करून देत साहित्यिक मनाला येईल ते लिहितात. आपल्या संस्कृतीमधील श्रद्धास्थानांबाबत विचार, अभ्यास आणि संशोधन केल्याशिवाय लिहू नये. सर्व साहित्यिक, कवींनी लक्ष्मणरेषा सांभाळावी असे आवाहन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे केले.
संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘संत रामदास स्वामी आणि तुकाराम यांच्या साहित्यातील समरसता’ या विषयावरील परिसंवादाचा समारोप करताना ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. या परिसंवादात रेखा नार्वेकर, डॉ. देवकर्ण मदन व सुनील चिंचोळकर यांनी भाग घेतला होता.
भारत सर्व जगाचे देवघर असून भारतातील विविध जाती, पंथांच्या सर्व संतांनी आपल्या साहित्यातून सामाजिक एकात्मता व राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक केली आहे. कथा-कादंबरी वाचून आपण अस्वस्थ होतो तर संतसाहित्याचे वाचन केल्याने मनाला स्वस्थता व शांती मिळते. प्रत्येकालाच संतवाङ्मयात आपल्याला जे हवे आहे ते सापडते. संतांचे चिंतन विश्वात्मक असून संत रामदास व तुकाराम या दोघांनीही आपल्या साहित्यातून समाज हिताचा, सामाजिक समरसतेचा व मानवतेचा विचार मांडला आहे, असेही अभ्यंकर म्हणाले.
सुनील चिंचोलकर यांनी सामाजिक समरसता व बांधिलकी हे सर्व संतांचे वैशिष्टय़ असून रामदास व तुकाराम यांच्या साहित्यात ते ओतप्रोत भरले असल्याचे सांगितले. तर डॉ. मदन म्हणाले की, रामदास - तुकोबा यांच्यासह सर्व संतांनी मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा संदेश जगाला दिला. यावेळी रेखा नार्वेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

लेखकाने कणाहीन होणे
‘लेखकाने कणाहीन होणे साहित्य-संस्कृतीसाठी लाजीरवाणे’
मुंबई, १९ मार्च / प्रतिनिधी
डॉ. आनंद यादव यांनी आधी आपले अध्यक्षपद शाबूत राखण्यासाठी ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी मागे घेतली आणि आता वारकरी संप्रदायाच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून अध्यक्षपदही सोडून दिले. लेखकाने एवढे कणाहीन होणे एकूणच साहित्य-संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे आहे, असे मत ‘लोकवाङ्मय प्रकाशन गृह’ संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
डॉ. यादव यांचा कादंबरी मागे घेण्याच्या निर्णयाबरोबरच संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करून सतीश काळसेकर यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे की, डॉ. यादव आणि वारकरी संप्रदायाचे मठाधिपती दोघेही मराठी सांस्कृतिक विश्वात घातक पायंडे पाडत आहेत. समाजाचा विवेक, सहिष्णुता जागी ठेवण्याची मोलाची कामगिरी पार पाडणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या आजच्या नेत्यांची लेखकांविरुद्धची, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्धची दहशतखोर भाषाही तितकीच मान खाली घालायला लावणारी आहे. तुकाराम महाराज यांची संत आणि कवी म्हणून असलेली थोरवी वादातीत आहे. त्यांचे चारित्र्यहनन करणारा मजकूर जर कोणी लेखक आपल्या कादंबरीत लिहित असेल तर त्याला उत्तर देण्याचे, त्याचा अप्रामाणिकपणा उघड करण्याचे इतरही मार्ग असल्याचेही काळसेकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

पाडगावकर यांचा नकार
साहित्य संमेलनाध्यक्षपद
पाडगावकर यांचा नकार तर सारडा सरसावले
मुंबई, १८ मार्च / प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या राजीननाम्यामुळे नव्या अध्यक्षपदासाठी जी काही नावे चर्चेत आहेत, त्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर आणि समीक्षक शंकर सारडा यांचा समावेश आहे. मात्र प्रकृतीअस्वाथ्यामुळे संमेलनाध्यक्षपद स्वीकारण्यास पाडगावकर यांनी नकार दिला आहे तर सारडा मात्र इच्छुक आहेत.
८२ व्या महाबळेश्वर संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सारडा हे यादव यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र ते पराभूत झाले. निवडणुकीत दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यातील एकाने राजीनामा दिला असल्याने माझ्या नावाचा विचार करण्यास हरकत नाही. अद्यापपर्यंत महामंडळाकडून मला याविषयी विचारणा करण्यात आलेली नाही, मात्र जर विचारणा केली गेली तर त्याला माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, असे सारडा यांनी सांगितले.
संमेलनासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने नवीन प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा वेळ नाही. याबाबतचा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे आणि मी संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार असल्याने माझ्या नावाचा विचार व्हावा, असे मला वाटत असल्याचेही सारडा म्हणाले.
दरम्यान मंगेश पाडगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत तरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. आणि जरी कोणी संपर्क साधला तरी मला प्रकृतीअस्वास्थ्यामुळे जाणे व प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या विनंतीला माझा विनम्र नकार असेल. मला नागीण झाल्यामुळे मी सध्या घरीच आराम करत आहे. लंडन येथील कार्यक्रम खूप अगोदर ठरल्यामुळे आणि माझ्या न जाण्याने आयोजकांचे नुकसान होऊ नये, म्हणून मी तेथे गेलो होतो, असेही पाडगावकर यांनी स्पष्ट केले.

असंभवमध्ये दिलीप प्रभावळकर
असंभव’मध्ये प्रभावळकर'
मुंबई, १५ मार्च / प्रतिनिधी
झी मराठीवरील ‘असंभव’ या मालिकेत आता लवकरच अभिनेते दिलीप प्रभावळकर एका भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतील दिलीप प्रभावळकर यांची ‘टिपरे आजोबा’ ही भूमिका खूप गाजली होती. आता दीर्घ कालावधीनंतर प्रभावळकर हे पुन्हा छोटय़ा पडद्यावर परतत आहेत.‘असंभव’ मालिकेत प्रभावळकर एका नव्या भूमिकेत दिसणार असून त्यांची ही भूमिका मालिकेतील अनेक असंभव गोष्टी संभव करून दाखवणार आहेत. ‘असंभव’मालिकेने सहाशे भागांचा टप्पा पार केला असून मालिकेचे कथानक एका गूढ वळणावर येऊन थांबले आहे. ‘असंभव’ मालिकेत लवकरच प्रभावळकर हे या भूमिकेद्वारे दाखल होत आहेत. ते जे पात्र रंगवत आहेत, त्याची पूर्वसूचना मालिकेतील सुलेखाला मिळते. त्यामुळे ती अस्वस्थ झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार त्याचा उलगडा लवकरच मालिकेत होणार आहे.

छायाचित्रातून उलगडणार महाबळेश्वर
मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उलगडणार छायाचित्रातील महाबळेश्वर!
प्रतिनिधी
येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘महाबळेश्वर आणि सभोवतालचा परिसर’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेत हौशी आणि व्यावसायिक अशा दोन्ही गटातील छायाचित्रकारांना सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यातील जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे यांनी केले आहे. स्पर्धेसाठी महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी, तापोळा आदी परिसरातील छायाचित्रे पाठवायची आहेत.
हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांनी ८ बाय १२ या आकारातील रंगीत किंवा कृष्णधवल छायाचित्रे येत्या १५ मार्चपूर्वी महाबळेश्वर येथील संमेलनाच्या कार्यालयात पाठवावीत. प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त चार छायाचित्रे पाठवता येतील. तज्ज्ञांची निवड समिती स्पर्धकांच्या छायाचित्रांची निवड करणार असून स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून ती विनाशुल्क आहे. स्पर्धेसाठी पाठवलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. सहभागी स्पर्धकांनी आपली छायाचित्रे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन समिती, ८२ वे अखिल भारतीय मराठी संमेलन कार्यालय, वेण्णा दर्शन, माखरिया गार्डनसमोर, महाबळेश्वर-४१२८०६ येथे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सारडा समान संधी पुरस्कार
कांचन परुळेकर यांना सारडा समान संधी पुरस्कार
‘स्वयंसिद्धा’ च्या माध्यमातून हजारो महिला, मुले आणि मागासवर्गीयांना रोजगार
मुंबई, १३ मार्च / प्रतिनिधी
सारडा समान संधी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या २००८ या वर्षीच्या सारडा समान संधी राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोल्हापूर येथील ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत शिंगणे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
सात लाख एक्कावन्न हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १६ मार्च रोजी मुंबईत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. चर्चगेट येथील इंडियन र्मचट्स चेंबरच्या वालचंद हिराचंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा समारंभ होणार आहे.
कोल्हापूर, राधानगरी या शहरी विभागाबरोबरच मल्लेवाडी, सारोळी, बुजवणे, शिरसे, सातवे, माजगाव आदी ग्रामीण विभागातील सुमारे २७ हजारांहून अधिक महिला, मुले आणि मागासवर्गीयांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना परुळेकर यांनी स्वावलंबी केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महिलांचे महिला उद्योजक, प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी, स्वयंसेवक असे गट तयार करून प्रत्येक गटासाठी त्यांच्या संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. विशेष बाब म्हणजे शासकीय मदत किंवा अनुदानापासून त्या दूर राहिल्या आहेत. ही मदत न घेता बचतगटापासून सामुदायिक शेती, ससेपालन, कुक्कुटपालन आदी पशुसंवर्धन व्यवसायात त्यांनी महिलांना कार्यरत केले आहे. गृहोपयोगी वस्तू तयार करून त्याची विक्री करण्यापर्यंतचे प्रशिक्षण त्यांनी या महिलांना दिले असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.
स्वानंद सखी फिचर्स, स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था, आरोग्यम धनसंपदा, मार्गदिपा तसेच अन्य उपक्रमही परुळेकर यांच्या स्वयंसिद्धातर्फे चालविण्यात येत आहेत. आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि तरीही त्यांच्या कामाची दखल न घेतलेल्या व्यक्ती, संस्था यांचा शोध घेऊन त्यांना फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देऊन गेल्या नऊ वर्षांपासून गौरविण्यात येत आहे. २००० मध्ये पहिला पुरस्कार बाळासाहेब कोळेकर यांना देण्यात आला होता. त्यानंतर आत्तापर्यंत मधुसूदन मिस्त्री (२००१), वीजी श्रीनिवासन (२००२), रतन कात्यायनी (२००३), विवेकानंद (२००४), गिरिजा सतीश (२००५), एन. राधा (२००६), डॉ. परमेश्वर राव (२००७) यांना सारडा समान संधी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

वांग्याच्या भरीताची मेजवानी
महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात वांग्याच्या भरिताची मेजवानी!
शेखर जोशी
महाबळेश्वर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करून सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना तीन दिवसांच्या भोजनात अन्य रुचकर पदार्थाबरोबरच खास वांग्याच्या भरिताची मेजवानी मिळणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी वांग्याच्या भरिताचा हा खास बेत ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून संमेलनातील भोजनाच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलन ज्या जिल्ह्यात किंवा ज्या गावात होत असेल, त्या ठिकाणाचे खास खाद्यपदार्थ भोजनात ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलनात सहभागी होणारे प्रतिनिधी, निमंत्रित आणि मान्यवरांसाठी तीन दिवसांच्या भोजन व्यवस्थेत रोज वेगवेगळा मेनू ठेवण्यात येतो. त्यामुळे साहजिकच येत्या २० ते २२ मार्च दरम्यान महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडूनही त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनात खास वांग्याच्या भरिताचा बेत ठरविण्यात आला आहे.
वांग्याचे झणझणीत भरीत आणि भाकरी किंवा पोळी म्हटली की चोखंदळ खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात तर वांग्याचे भरीत म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. येथे मार्च महिन्यातही बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे आयोजकांनी येणाऱ्या पाहुण्यांना खास वांग्यांचे भरित खाऊ घालायचे ठरवले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाबळेश्वर शाखा, चौफेर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आमच्या महाबळेश्वरची वांगी प्रसिद्ध आहेत. ही वांगी खास भरिताची म्हणूनही ओळखली जातात. त्यामुळे संमेलनाच्या तीन दिवसांच्या भोजनाच्या मेनूत आलेल्या पाहुण्यांना या खास वांग्यांच्या भरिताची मेजवानी आम्ही देण्याचे ठरवले असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
साहित्य संमेलनाच्या नोंदणीसाठी १० मार्च ही शेवटची तारीख होती. मात्र साहित्यप्रेमी आणि रसिकांच्या विनंतीवरून ही मुदत आता १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. संमेलनासाठी सुमारे दीड हजार साहित्यप्रेमी, रसिक आणि वाचकांची संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी होईल. तर उद्घाटन सोहळा आणि अन्य परिसंवाद व कार्यक्रमांना सुमारे तीन ते चार हजार रसिक उपस्थित राहतील, असा विश्वासही ढेबे यांनी व्यक्त केला.

तुकारामांच्या भेटीला जगभरातील नेटकरी
तुकारामांच्या भेटीला जगभरातील ‘नेटकरी’!
शेखर जोशी
मुंबई, ११ मार्च
महाराष्ट्रातील सर्व संतांनी ज्या पंढरीच्या विठुरायाचे आपल्या अभंगातून वर्णन केले आणि ज्याला आपला सखा मानला त्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरीची वारी करीत असतात. पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणेच सध्याच्या संगणक आणि इंटरनेटच्या महाजालात ‘नेटकरी’ विविध संकेतस्थळांना भेट देत असतात. संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा आणि त्याच्याविषयी माहिती देणाऱ्या www.tukaram.com या संकेतस्थळालाही गेल्या काही वर्षांत केवळ महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगभरातून १३५ देशांमधील ‘नेटकरी’ नित्यनेमाने भेट देत आहेत.
संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने, १७ फेब्रुवारी २००२ या दिवशी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आणि गेल्या सात वर्षांत या संकेतस्थळाला जगभरातून लाखो लोकांनी भेट दिली आहे. सध्या जगातील १३५ देशांमधील लोक नित्यनेमाने या संकेतस्थळाला भेट देत असून त्यात इंग्लंड, अमेरिका या देशांसह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बहारिन, बांगलादेश, बेल्जियम, ब्राझील, कोलंबिया, कतार, जर्मनी, ग्रेटब्रिटन, नेपाळ, नेदरलॅण्ड आणि अन्य अनेक देशांचा समावेश आहे.
मराठीसह हिंदूी, कोकणी, सिंधी, संस्कृत, गुजराथी, बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आदी भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये हे तसेच इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनीश, नेदरलॅण्ड आदी परकीय भाषेतही हे संकेतस्थळ आणि त्यावरील लेख व माहिती उपलब्ध आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले असून या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, डॉ. सदानंद मोरे, देवेन राक्षे आणि अन्य सहकाऱ्यांची मोलाची मदत झाली आहे. पेशाने सिव्हिल इंजिनीअर असणारे दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक आहेत.या संकेतस्थळावर देहू संस्थानने उपलब्ध करून दिलेली अभंगगाथा असून ती डाऊनलोड केली तर सर्व अभंग वाचायला मिळू शकतात. संकेतस्थळावर संत तुकाराम यांचे चरित्र वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले असून हा अनुवाद केदारनाथ व नीलकंठ पंचभाई (गुजराती), सुरेश आमोणकर (कोकणी), आशा गुर्जर व डॉ. देवीदास खरवंडीकर (संस्कृत), विरुपाक्ष कुलकर्णी (कन्नड), भालचंद्र आपटे (तेलगू), एन. ई. विश्वनाथ अय्यर (मल्याळम), एन. गोपाल (तामिळ) आदींनी केलेला आहे.

ई वाटाड्या
लेखक-प्रकाशक आणि वाचकांचा ‘ई वाटाडय़ा’!
प्रतिनिधी
मराठी भाषेखेरीज अन्य भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. भारतीय भाषांमध्ये हिंदूीसह बंगाली आणि अन्य भाषेत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात नवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठीमध्येही वर्षांकाठी सुमारे बाराशे पुस्तके प्रकाशित होत असून ती सर्व वाचकांपर्यंत पोहोचतातच असे नाही. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता केवळ मराठीच नव्हे तर अन्य भारतीय भाषांमधील पुस्तके लेखक, प्रकाशक आणि वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता ‘ई वाटाडय़ा’ उपलब्ध झाला आहे.
विविध भाषा आणि प्रातांमधील ही विविध पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावीत, या मुख्य उद्देशाने नोव्हाटिक टेक्नॉलॉजी कंपनीचे योगेश पालकर यांनी हा ई वाटाडय़ा तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी www.indianprintworld.com हे संकेतस्थळ सुरू केले असून त्यावर विविध भाषांमधील नवनवीन पुस्तकांची माहिती वाचकांना मिळू शकणार आहे.
या संकेतस्थळावर लेखक किंवा प्रकाशकांना आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासह पुस्तकाबाबतची थोडक्यात माहिती, त्याची किंमत, पुस्तक कुठे मिळेल याची माहिती यावर देता येणार आहे. त्यासाठी लेखक किंवा प्रकाशकाला या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीनंतर संबंधितांना मेल आयडी मिळणार असून त्याद्वारे वाचकांना किंवा लेखक-प्रकाशकांना संपर्क साधता येणार आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे ‘युनीकोड’ तंत्राचा वापर करून येथे मजकूर लिहिता येणार आहे. त्यामुळे भारतातील विविध २२ भाषांमध्ये सवांद साधता येणार आहे.
मराठी, हिंदूी, इंग्रजी आणि संस्कृतसह भारतातील आसामी, मणिपुरी, बंगाली, बोडो, डोंगरी, पंजाबी, गुजराथी, राजस्थानी, काश्मीरी, सिंधी, कोकणी, तामिळ, मल्याळम, ऊर्दू आदी भाषांमधील नवनवीन पुस्तकांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे.

रिअल बेस्ट प्रवास
प्रवाशांना मोफत‘रिअल बेस्ट’ प्रवास!
‘सरकार की दुनिया’च्या प्रमोशनचा आगळा फंडा
प्रतिनिधी
सध्याचे युग मार्केटिंगच्या नवनव्या फंडय़ांचे असून आपल्या प्रॉडक्टची जाहिरात वेगवेगळ्या प्रकारे आणि माध्यमातून केली जाते. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या ‘रिअल’ या नव्या चॅनेलनेही प्रसिद्धीसाठी अशाच प्रकारे एका अनोख्या तंत्राचा वापर मुंबईच्या विविध भागात केला. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस मुंबईकर बेस्ट प्रवाशांना या चॅनेलतर्फे मोफत प्रवास घडविण्यात आला. या चॅनेलवर नव्याने सुरू झालेल्या ‘सरकार की दुनिया’ या रिअॅलिटी शोच्या प्रसिद्धीसाठी जाहिरातीचा हा फंडा वापरण्यात आला.
‘रिअल’ चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी रात्री दहा वाजता ‘सरकार की दुनिया’ हा रिअॅलिटी शो सादर होत असून अभिनेता आशुतोष राणा या कार्यक्रमात ‘सरकार’ची मध्यवर्ती भूमिका करत आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील १८ लोक सहभागी झाले असून त्यांना एका निर्जन बेटावर ठेवण्यात आले आहे. तेथे पाणी, वीज तसेच अन्य कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. साधे प्यायचे पाणी हवे असेल तर या मंडळींना विहिर खणावी लागते. पुढील अठरा आठवडे हा कार्यक्रम सुरू 3राहणार आहे. या अठरा मंडळींना बेटावर राहत असताना कोणकोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागते, ते तेथे कसे राहतात ते या शोमध्ये दाखवले आहे. तर रात्री आठ वाजता ‘पोकर फेस’ हा नवा कार्यक्रम सुरू असून तो अभिनेता शर्मन जोशी सादर करत आहे.
सोमवार आणि मंगळवार या दिवशी मुंबई आणि उपनगरातील कांदिवली, अंधेरी, कुर्ला, वांद्रे, आरसी चर्च, इलेक्ट्रिक हाऊस, घाटकोपर, वरळी, कुलाबा, जेव्हीपीडी आणि अन्य काही मार्गावर धावणाऱ्या ‘बेस्ट’च्या बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. बसमध्ये तिकीट काढायचे नसल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्का बसला. त्यांनी आपल्या ज्या ठिकाणी जायचे आहे, त्याचे तिकीट बेस्टबसच्या वाहकाकडे मागितले असता, तिकीटाचे सर्व पैसे ‘रिअल’ चॅनेलकडून ‘बेस्ट’ला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशांना तिकीट काढावे लागले नाही आणि या मार्गावरील बेस्टच्या वाहकानाही दोन दिवस आराम मिळाला. ‘रिअल’चॅनेलने २० बेस्टबसमध्ये दोन दिवस ही मोफक प्रवास सेवा उपलब्ध करून दिली होती. या दोन्ही कार्यक्रमांसाठी लोकांना वेळेवर घरी पोहोचता यावे, या मुख्य उद्देशाने मुंबईत दोन दिवस बेस्टच्या बसमधून मोफत प्रवास घडविण्यात आला.

कवितांचा पाऊस
महाबळेश्वर साहित्य संमेलनात नवोदित कवींच्या काव्यसंमेलनासाठी आयोजकांकडे कवितांचा पाऊस!
संमेलन प्रतिनिधी नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
महाबळेश्वर येथे येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या कवीसंमेलनासाठी आयोजकांकडे महाराष्ट्रातून कवितांचा पाऊस पडला आहे. नवोदितांच्या कवी संमेलनासाठी कवींनी आपल्या कविता आयोजकांकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्रातील कवी मंडळींचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाबळेश्वर शाखा आणि चौफेर यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात नवोदित कवींचे काव्यसंमेलन होणार असून त्यासाठी नवोदित कवींनी स्वत:च्या तीन नव्या कविता आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून त्याची कॅसेट पाठवावी, असे आवाहन करण्यात आले होते. आलेल्या कवितांमधून तीस कवी आणि त्यांच्या कवितांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निवड समितीही स्थापन करण्यात आली आहे. कवयित्री नीता भिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या कवितांमधून निवडक कवितांची निवड केली आहे. काही कविता कॅसेटच्या माध्यमातून तर बहुतांश कविता या लिखित स्वरूपात आयोजकांकडे आल्या होत्या.
कविता पाठविण्याच्या आवाहनाला राज्याच्या विविध भागातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी निपाणी व अन्य भागातूनही काही कविता आल्या. कविता पाठविणाऱ्यांमध्ये विविध क्षेत्रातील आणि वयोगटातील कवींचा समावेश असून आलेल्या सर्व कवितांमध्ये विषयांचे वैविध्य दिसून आले. स्त्री भ्रूणहत्या, स्त्रीजीवन, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण आणि अन्य ज्वलंत विषयावरील कविता आल्याचे निवड समितीच्या भिसे यांनी सांगितले.
दरम्यान महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून संमेलनाच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे काम सुरू झाले आहे. महामंडळाच्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी घटक संस्थांमधून संमेलनाच्या प्रतिनिधींची नोंदणी सुरू आहे. नोंदणीची अंतिम तारीख १० मार्च अशी असून त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींची नेमकी संख्या सांगता येऊ शकेल. मात्र प्रतिनिधी नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबन ढेबे यांनी दिली.

गांधी साहित्यावरील कॉपीराईटचा अधिकार संपुष्टात
महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्त्वधना’चा अधिकार संपुष्टात!
कोणत्याही प्रकाशकाला गांधीसाहित्य प्रसिद्ध करता येणार
मुंबई, ५ मार्च / प्रतिनिधी
महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांंपासून असलेला ‘नवजीवन ट्रस्ट’चा स्वामित्त्वधनाचा (कॉपीराइट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्त्वधनाचे अधिकार नवजीवन ट्रस्टकडे असल्याने या ट्रस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता महात्मा गांधी यांचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.
महात्मा गांधी यांच्या समग्र साहित्यावर असलेला नवजीवन ट्रस्टचा स्वामित्त्व अधिकार नुकताच संपुष्टात आला. अहमदाबाद येथील नवजीवन ट्रस्ट या संस्थेला महात्मा गांधी यांनीच आपल्या समग्र साहित्याचे अधिकार दिले होते. साहित्याच्या स्वामित्त्वधनाच्या अधिकारानुसार ज्या व्यक्ती किंवा संस्थेला हे अधिकार देण्यात आलेले असतात, त्यांनाच कॉपीराइट कायद्यानुसार हे साहित्य प्रकाशित करता येते. अन्य कोणी जर हे साहित्य प्रकाशित केले तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. कॉपीराइट कायद्याचा भंग करणाऱ्याला भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. नवजीवन ट्रस्टकडे असलेल्या या अधिकारामुळे आजवर महात्मा गांधी यांचे जे काही साहित्य प्रकाशित झाले ते सर्व याच ट्रस्टने केले होते. मात्र असे असले तरी स्वामित्त्व अधिकाराच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी त्या व्यक्तीच्या साहित्यावरील स्वामित्त्वधनाचा अधिकार संपुष्टात येऊन ती सार्वजनिक संपत्ती होते. ३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. कॉपीराइट कायद्यानुसार साठ वर्षांनंतर म्हणजे यंदाच्या वर्षी जानेवारीच्या अखेरीस नवजीवन ट्रस्टचा महात्मा गांधी यांच्या साहित्यावरील कॉपीराइटचा अधिकार संपुष्टात आला. हा अधिकार पुन्हा ट्रस्टलाच मिळावा म्हणून केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावर सकारात्मक विचार करण्यात आला नाही. कॉपीराइटच्या कायद्यानुसार आता ट्रस्टचे स्वामित्त्व अधिकार संपुष्टात आल्यामुळे भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती कोणत्याही भाषेत हे साहित्य प्रकाशित करू शकते.
दरम्यान मुंबई सवरेदय मंडळ-गांधी बुक सेंटरचे व्यवस्थापक प्रेमशंकर तिवारी यांनी सांगितले की, नवजीवन ट्रस्टकडे असलेला कॉपीराइटचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीविचार आणि साहित्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रसार होईल, असे वाटते.
एकाच संस्थेकडे हे अधिकार असल्याने महात्मा गांधी यांच्या विचारांवरील साहित्य प्रकाशित करण्यास त्या संस्थेलाही काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात. मात्र आता भारतातील कोणीही प्रकाशक कोणत्याही भाषेत हे साहित्य प्रकाशित करू शकेल.

पाडगावकर यांचा सत्कार
लंडनच्या महाराष्ट्र मंडळात शुक्रवारी मंगेश पाडगावकर यांचा सत्कार
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी
लंडन येथील महाराष्ट्र मंडळ आणि काळे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ७ मार्च रोजी ज्येष्ठ कवी आणि राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्राप्त मंगेश पाडगावकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. लंडनच्या भारतीय विद्या भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमात हास्यकवी रामदास फुटाणे हे पाडगावकर यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लंडन येथील काही स्थानिक कलाकार पाडगावकर यांच्या कविता सादर करणार आहेत. याच वेळी पाडगावकर यांच्या आत्मकथनावरील एका दृकश्राव्य फितीचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
भारताबाहेरील मराठी लोकांचे सगळ्यात जुने मंडळ म्हणून लंडनचे महाराष्ट्र मंडळ ओळखले जाते. साहित्यसम्राट न. चिं. केळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. मुकुंदराव जयकर आणि अन्य मान्यवर मंडळाच्या स्थापनेपासूनच निगडीत होते. महाराष्ट्रातून आणि जगाच्या विविध भागातून मान्यवर मराठी व्यक्ती, नाटय़संस्था, गायक आदींना मंडळातर्फे नियमितपणे बोलावण्यात येते अशी माहिती लंडनयेथील ज्येष्ठ नागरिक मुकुंद नवाथे यांनी दिली. डॉ. मुकुंदराव काळे यांच्या निधनानंतर १८८५ मध्ये काळे ट्रस्टची स्थापना करण्यात आली. ट्रस्टसाठी काळे यांचे थोरले बंधू नानासाहेब यांनी भरघोस आर्थिक मदत केली. मदतीची गरज असलेल्या महाराष्ट्रीयन व्यक्तिंना त्यांची जातपात न पाहता मदत करण्यासाठी हा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. महाराष्ट्रात शिक्षण आणि औषधोपचार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थाना या ट्रस्टतर्फे मदत करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांसाठी ‘शब्दयात्रा’ हा उपक्रम चालविण्यात येतो.

नॅशनल बुक ट्रस्टच्या चार पुस्तकांचे आज प्रकाशन आणि चर्चासत्र
प्रतिनिधी
नॅशनल बुक ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल बुक ट्रस्टच्या सुवर्णजयंती मालिकेअंतर्गत आज चार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता, परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा, भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात होणार आहे. दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता हा चंद्रकान्त पाटील संपादित ग्रंथ आणि परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा या निशिकांत ठकार संपादित पुस्तकांचे प्रकाशन सकाळी १० वाजता उद्घाटन डॉ. चंद्रशेखर जहागिरदार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले भूषविणार आहेत. त्यानंतर ११ वाजता ‘स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता’ या विषयावरील परिसंवादात प्रा. नितीन रिंढे, डॉ. रमेश वरखेडे आणि प्रा. वसंत आबाजी डहाके सहभागी होतील. दुपारी २ वाजता होणाऱ्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. विलास खोले, प्रा. उदय रोटे आणि डॉ. सुधा जोशी सहभागी होतील. दु. ४.३० वाजता भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकांचे प्रकाशन हाईल. त्यानंतर ‘भगतसिंग आणि २१व्या शतकातील भारत’ या विषयावरील परिसंवादात कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आनंत तेलतुंबडे व कॉ. दत्ता देसाई सहभागी होतील.
‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ पुस्तक प्रकाशित
प्रतिनिधी
अमेरिकास्थित अभियंते सुधीर शं. कुलकर्णी लिहिलेल्या ‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी प्रभादेवी येथे ‘रचना संसद’च्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. ग्रंथायन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत नाशिककर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पूल बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्रीखंड कन्सल्टन्सी या संस्थेचे कार्यकारी संचालक राजीव श्रीखंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे, वसंत नरहर फेणे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूल आणि त्यांचे बांधकाम अशा वेगळ्या विषयावर मराठीमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले असल्याचे श्रीखंडे यांनी सांगितले तर अभियांत्रिकी क्षेत्रातील मंडळींनी आणि विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. त्यांच्यासाठी ते उपयुक्त असल्याचे मत, नाशिककर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
पुस्तकाचे लेखक सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या या पुस्तकाविषयी उपस्थिताना पडद्यावर सचित्र माहिती दिली. सुभाष भेंडे यांचेही या वेळी भाषण झाले. ग्रंथायन प्रकाशनचे पंकज कुरुलकर यांनी ‘ग्रंथायन’च्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. ज्योती आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर लाभेश गवळी यांनी आभार मानले.

स्वरार्थरमणीतून उलगडणार किशोरीताईंची
स्वरार्थरमणी’ ग्रंथातून उलगडणार किशोरीताईंची गानतपश्चर्या
मुंबई, ३ मार्च / प्रतिनिधी
‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ म्हणजे आजवर मी जे गायले आहे, त्या गाण्यावरचे माझे स्वत:चे चिंतन आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून हा ग्रंथ सिद्ध झाला असल्याचे प्रतिपादन गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी आज दादर येथे केले. ‘नाटय़संपदा प्रतिष्ठान’ने शिवाजी मंदिर येथील शिवनेरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. किशोरीताईंच्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ६ मार्च रोजी ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते होणार आहे. त्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर, लेखक दाजी पणशीकर या वेळी उपस्थित होते.
लोकांचे मनोरंजन करणे हा संगीताचा मूळ हेतू नसून संगीत हे अलौकिक ज्ञानाचे रूप आहे. संगीत हे आत्मरंजनासाठी आहे. संगीतातून आपल्या आत्म्याशी संवाद साधला गेला पाहिजे. आईच्या गर्भातूनच मी संगीत शिकत आले. आतापर्यंत मी जे काही केले ते कमीच आहे, असे मला वाटते. संगीतातील राग, सूर म्हणजे घराणे नव्हे, असे सांगून त्या म्हणाल्या, की संगीतातील रससिद्धांत शिकणे म्हणजे स्वत:ला विसरून ज्ञानाची आस धरणे आहे. सूर बंद न ठेवता तो प्रवाही ठेवणे हे भारतीय शास्त्रीय संगीताचे मुख्य वैशिष्टय़ आहे.पुस्तकाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचा या लेखनाचा बोलविता धनी वेगळाच आहे. अंत:स्फूर्तीने जे मी बोलले त्यातून हे पुस्तक साकारले आहे. आजच्या पिढीतील मुलांना संगीताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळावी, हा उद्देश या लेखनामागे असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. संगीतातील रससिद्धांत म्हणजे काय? रस आणि भाव यांचे स्थान काय? रागातून विशिष्ट रस प्रचित होतो की नाही, अशा अनेक प्रश्नांचा शोध यातून घेण्यात आला, असल्याचेही त्या म्हणाल्या.या वेळी बोलताना प्रभाकर पणशीकर म्हणाले, की साहित्यातील रससिद्धांत संगीताला लावण्याचा यशस्वी प्रयत्न किशोरीताईंनी या ग्रंथाद्वारे केला आहे, तर दाजी पणशीकर यांनी सांगितले, की संगीतशास्त्रातील सैद्धांतिक स्वरूपाचा हा ग्रंथ असून, आजवर असा प्रयत्न कोणी केला नव्हता. साहित्याचे सिद्धांत संगीताला लावता येतात, हे किशोरीताईंनी या ग्रंथातून दाखवून दिले आहे.दादर-माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात रात्री आठ वाजता होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका उद्यापासून नाटय़गृहावर उपलब्ध असतील. याच कार्यक्रमात विजया मेहता किशोरीताईंची प्रगट मुलाखत घेणार असून, डॉ. सदानंद बोरसे व दाजी पणशीकर हे ग्रंथाविषयी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. याच पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या ९ मार्च रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात संध्याकाळी सहा वाजता होणार आहे.
‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम आणि संगीताचे अभ्यासक केशव परांजपे हे या वेळी किशोरीताईंची प्रकट मुलाखत घेणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त अरुण फडके यांनी या वेळी दिली.

Sunday, April 19, 2009
लिटिलचॅम्प्स लागले परीक्षेच्या तयारीला
लिटिल चॅम्प्स’ लागले परीक्षेच्या तयारीला!
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी
झी-मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठून सहभागी ‘लिटील चॅम्प्स’ना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रम संपला असल्यामुळे आता हे सर्व लिटिल चॅम्प्स वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र या अभ्यासाबरोबरच ‘पंचरत्न’-भाग दोन या नव्या आल्बमची तयारी आणि राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही ते सर्व जण व्यस्त आहेत.
‘सारेगमप’च्या महाअंतिम फेरीच्या वेळेस युनिव्हर्सल कंपनी आणि झी-मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लिटिल चॅम्प्सचा आल्बम ‘पंचरत्न’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ‘पंचरत्न’चा पहिला भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. ही ध्वनिफीत असून त्यात सर्व लिटिल चॅम्पसनी ‘सारेगमप’ मध्ये म्हटलेल्या गाण्यातील काही निवडक गाणी देण्यात आली आहेत. आता ‘पंचरत्न’च्या दुसऱ्या भागाची तयारी करण्यात येत असून लवकरच हा भाग प्रकाशित होणार आहे. या भागात सर्व लिटिल चॅम्प्सनी गायलेली पूर्णपणे नवीन गाणी असणार आहेत. सध्या हे सर्व लिटील चॅम्प्स मुंबईत आहेत. आज वांद्रे येथील युनिव्हर्सल कंपनीच्या कार्यालयात या सर्वाची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घडविण्यात आली. सेटवर जशी त्यांची धमाल सुरू असायची तशीच ती येथेही सुरू होती. ‘सारेगमप’चे पर्व संपले असले तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भेटतच असतो. त्यामुळे कार्यक्रम संपला आहे असे वाटतच नाही. सध्या आम्ही सर्वजण वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागलो असल्याचे रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी सांगितले. ‘सारेगमप’च्या पर्वासाठी आम्ही गेले सहा महिने मुंबईतच होतो. त्यामुळे शाळेत बुडालेला अभ्यास आम्ही भरून काढत असून आता वार्षिक परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागलो असल्याची एकमुखी प्रतिक्रिया या सर्वानी व्यक्त केली.
मुग्धा म्हणाली की, माझी चौथीची वार्षिक परीक्षा पुढील महिन्यात २३ मार्चपासून सुरू होत असून बुडालेला अभ्यास आणि वार्षिक परीक्षेचीही तयारी मी सुरू केली आहे. तर आर्याने सांगितले की, आम्ही सर्वजण भेटत असलो तरी पल्लवीताई, अवधुतदादा व वैशाली ताई आणि कार्यक्रमातील सर्व दादांना मात्र आम्ही ‘मीस’ करत आहोत. मी आता नववीची परीक्षा देणार आहे. ‘सारेगमप’च्या पर्वातील माझ्या खास मैत्रिणी अवंती आणि शमिका व मी आम्ही कायम फोनवरून एकमेकींच्या संपर्कात असतो. तर कार्तिकी म्हणाली की, मी यंदा सहावीची परीक्षा देणार असून अभ्यासाबरोबरच माझ्या बाबांकडेच गाणे शिकणेही सुरू आहे.
मी सध्या आठवीच्या अभ्यासावर जोर देत असून माझे वैयक्तिकरित्या गाणे शिकणे सुरू असल्याचे रोहित म्हणाला तर प्रथमेशने सांगितले की, मी यंदा नववीची परीक्षा देणार असून सध्या अभ्यास जोरात सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही सगळेच आमच्या नव्या आल्बमच्याही तालमी करत आहोत.

शास्त्रीय संगीतासाठी राज्याचे विशेष पॅकेज
भारतीय अभिजात संगीतासाठी राज्याचे विशेष पॅकेज
* पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने युवा शिष्यवृत्ती योजना
* मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव
* किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकुल
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
राज्य शासनाने भारतीय अभिजात संगीतासाठी आज एका विशेष पॅकेजची घोषणा केली असून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव आणि पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ मिळाल्याचे औचित्य साधून हे पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची सविस्तर माहिती दिली. पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना, मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व स्मारकाच्या सहकार्याने किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकूल आणि अन्य काही योजनांचा यात समावेश आहे. या आणि अन्य सर्व उपक्रमांसाठी दरवर्षी दोन कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
भीमसेन जोशी यांच्या नावाने वय वर्षे १० ते १७ आणि १८ ते ३५ अशा दोन गटांसाठी दहाजणांना नऊ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एका कलावंताला दोन वर्षांसाठी दरमहा अनुक्रमे पाच हजार आणि १० हजार अशी शिष्यवृत्ती असेल. भीमसेन जोशी यांच्या नावाने मुंबईत दरवर्षी तीन ठिकाणी पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर तीन दिवसांचे संगीत महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्यभरातील विविध संस्थांना राज्यशासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शास्त्रीय आणि भारतीय अभिजात संगीतासाठी जाहीर केलेल्या या पॅकेजसाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार असून २००९-१० या आर्थिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीताची परंपरा अधिक जोमाने पुढे जावी आणि राज्यातील कलावंताना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.

टी. एन. शानभाग यांचे निधन
स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’चे संस्थापक टी. एन. शानभाग यांचे निधन
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
सर्वसामान्य वाचक ते विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आणि पुस्तके यांच्यातील लोकप्रिय दुवा असलेले स्ट्रॅण्ड बुक स्टॉलचे संस्थापक पद्मश्री टी. एन. शानभाग यांचे आज वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुस्तकांच्या दुकानाकडे शानभाग यांनी कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. स्वत: शानभाग हे एक चांगले वाचक आणि साहित्यप्रेमी होते. केंद्र शासनानेही शानभाग यांना ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देऊन गौरविले होते. फोर्ट परिसरातील सर पी. एम. मार्गावरील शानभाग यांचे ‘स्ट्रॅण्ड बुक हाऊस’ हे केवळ पुस्तकांचे दुकान नव्हते तर ते साहित्य-सांस्कृतिक वर्तुळातील रसिकांचे एकमेकांना भेटण्याचे आणि गप्पांचे फड जमविण्याचे एक हक्काचे ठिकाण होते. शानभाग यांच्या निधनाने पुस्तकांचा खरा मित्र हरपल्याची भावना साहित्य आणि पुस्तकप्रेमींमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
शानभाग यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील एका गावात झाला. त्यांचे वडील मोठे जमीनदार होते. ते दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. शानभाग यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कर्नाटकातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सेंट झेविअर्स महाविद्यालयात दाखल झाले. त्याच काळात ते अर्धवेळ नोकरीही करत होते. त्या काळात ताडदेव ते महाविद्यालयापर्यंत ट्रामचे पाच रुपये वाचवून चालत जात. आणि बचत केलेल्या पैशातून पुस्तके विकत घेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुस्तकविक्रीचा व्यवसाय करायचा असे त्यांनी ठरवले होते. काही दिवस रस्त्यावर पुस्तकांची विक्री केल्यानंतर एकदा स्ट्रॅण्ड चित्रपटगृह परिसरातील एक मोकळी जागा त्यांना दिसली. त्यांनी तातडीने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे जाऊन ही जागा मिळविण्याबाबत विचारणा केली. त्यांनी जागेचे मालक के. के. मोदी यांची भेट घेण्यास सांगितले. मोदी यांची भेट झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत दरमहा ४५० रुपये इतके भाडे देऊन त्यांना ही जागा मिळाली. पुढे मेहनतीने शानभाग यांनी हा व्यवसाय वाढवला. पुस्तकविक्रीच्या क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून आपल्या नावाचा आणि दुकानाचा खास ठसा उमटवला.
शानभाग यांनी २० नोव्हेंबर १९४८ मध्ये स्ट्रॅण्ड बुक स्टॉलची स्थापना केली. त्यांच्या दुकानात सर्व प्रकारच्या पुस्तकांवर २० टक्के इतकी सवलत मिळत असे. तर काही पुस्तकांवर चक्क ६५ टक्क्यांपर्यतही सवलत देण्यात येत असे. स्टिफन हॉकींग यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाची मूळ किंमत १ हजार ७७५ रुपये होती. मात्र ‘स्ट्रॅण्ड’मध्ये ते ६५ टक्के सवलत देऊन ६२५ रुपयांना त्याची विक्री करण्यात आली. तसेच नोबेल पुरस्कार विजेते व्ही. एस. नायपॉल यांचे ‘हाफ ए लाईफ’ हे १ हजार २०५ रुपये किंमतीचे पुस्तक ७७ टक्के इतकी सवलत देऊन अवघ्या २७५ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. गेली ५७ वर्षे शानभाग दररोज पुस्तकांच्या दुकानात येत असत. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापर्यंतचे उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आपल्या दुकानात पुस्तक खरेदीसाठी येऊन गेल्याचे शानभाग अभिमानाने सांगत असत. याच डॉ. कलाम यांच्याकडून आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला, याचाही ते गौरवाने उल्लेख करत. रात्री उशिरा शानभाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुस्तकातील विज्ञानाचे धडेr
विद्यार्थ्यांनी गिरवले पुस्तकातील विज्ञानाचे धडे!
प्रतिनिधी
विज्ञानातील धडे हे केवळ विज्ञानाच्या पुस्तकापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या यंदाच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सहावी आणि नववीचे ३३ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे यंदाचे २७ वे वर्ष होते.
स्वयंसेवेतून विद्यार्थ्यांना समस्या जाणून घेता येतात आणि त्यातून विज्ञानाचे वेगळ्या प्रकारे ज्ञान मिळते. हे ज्ञान केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेले असल्याने तसेच या प्रकल्पात पालकांचाही सहभाग असल्याने त्या विद्यार्थ्यांसह अवघे कुटुंब विज्ञानमय होऊन जाते. नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दैनंदिन वापरातील रसायनांचे घातक परिणाम’ असा विषय देण्यात आला होता. आपण आपल्या घरात विविध रसायनांच्या आणि पदार्थाच्या माध्यमातून हे घातर रासयनिक पदार्थ आपल्या घरी आणत असतो. मात्र ते टाळणे आपल्याच हातात असते, हे यातून मुलांच्या मनावर िबबवायचे होते.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून ३१ जणांची सुवर्ण तर २४० जणांची रजत पदकासाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच डॉ. बाळ फोंडके यांच्या हस्ते परळ येथील दामोदर नाटय़गृहात पार पडला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. फोंडके म्हणाले की, विज्ञानामुळे केवळ व्यक्तिमत्व विकासच नव्हे तर देशसेवेचेही समाधान मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी विज्ञानात न रमता तेच विज्ञान आपल्याला दैनंदिन जीवनात कसे आत्मसात करता येईल आणि त्यातून आपल्याला आणि इतरांनाही कसा आनंद मिळेलयाचा प्रयत्न करावा.मंडळातर्फे इतकी मोठी स्पर्धा दरवर्षी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय कार्यकर्त्यांच्या मदतीने घेण्यात येत
आहे.

स्लमडॉगची मूळ कथा आता मायबोलीतl
स्लमडॉग’ची मूळ कथा आता मायबोलीत!
मुंबई, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी
जगभरातील चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या आठ बाहुल्या मिळविणाऱ्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत ‘न भूतो’ असा इतिहास घडवला. हा इतिहास घडविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या ‘क्यु अॅण्ड ए’ या मूळ कादंबरीचा मराठी अनुवाद पुढील महिन्यात प्रकाशित होत आहे. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनील मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला ही माहिती दिली. भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रिटोरियातील भारताचे राजदूत विकास स्वरूप यांनी लिहिलेली ‘क्यू अॅण्ड ए’ ही कादंबरी २००५ मध्ये प्रकाशित झाली होती.
आत्ताच ही कादंबरी सुमारे ४० भाषांमध्ये अनुवादित झाली असून ऑस्कर पुरस्कारामुळे आता या कादंबरीचा केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक पातळीवरही विविध भाषांमध्ये अनुवाद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनील मेहता यांनीही ही कादंबरी मराठीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आणि मार्च महिन्यात ही कादंबरी प्रकाशित होत आहे.
येत्या २० मार्च रोजी ‘क्यू अॅण्ड ए’चा मराठी अनुवाद प्रकाशित होणार असून वंदना अत्रे यांनी हा अनुवाद केला आहे. ‘स्लमडॉग’च्या गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवलेले ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मेहता यांनी सांगितले.

छायाचित्रांमधून उलगडला २६/११ चा थरार
छायाचित्रांमधून उलगडला २६/११चा थरार..!
मुंबई, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील २६ तारखेला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी आजही सर्वाच्या मनात आहेत. हल्ल्यानंतर मुंबई आणि मुंबईकर सावरले आणि पुन्हा आपल्या कामाला लागले. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचे छायांकन करणे हे मुंबईतील विविध वृत्तपत्रातील छायाचित्रकारांसाठीही एक आव्हान होते. मुंबईत अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली होती. छायाचित्रकारांनी आपला जीव धोक्यात घालून हा थरार टिपला. मुंबई न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशनने हा सर्व थरार सर्वसामान्यांसाठी एका छायाचित्र प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिला आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात २६ नोव्हेंबरचा हल्ला आणि त्यानंतरच्या विविध छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते सर्वासाठी येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत विनामूल्य खुले आहे. असोसिएशननेवृत्तछायाचित्रकारांना आवाहन करून प्रदर्शनासाठी या विषयावरील छायाचित्रे मागविण्यात आली होती. सुमारे दोन हजार छायाचित्रांमधून ७८ छायाचित्रांची निवड करण्यात आली. ४८ छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली असून आर्को दत्ता आणि दिनेश कृष्णन यांनी आलेल्या छायाचित्रातून काही छायाचित्रांची निवड केली, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र परिख यांनी दिली.
छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कोणीही राजकीय नेता किंवा ‘व्हीआयपी’यांच्याकडून न करता वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. प्रदर्शनात ज्या छायाचित्रकारांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत, त्या सर्वानी आपला कॅमेरा खाली जमिनीवर ठेवून २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात मरण पावलेले सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी व एनएसजी कमांडोना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी सुरू करण्यात आल्याचे परिख यांनी सांगितले.
‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘लोकसत्ता’च्या अकरा छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रदर्शनात असून अन्य छायाचित्रांमध्ये मुंबईतील विविध भाषेतील वृत्तपत्रे, साप्ताहिके आदींच्या छायाचित्रकारांचा समावेश आहे. मुंबईतील दहशतवाद्यांच्या हल्ल्याची सुरुवात कुलाबा येथील लिओपोल्ड क्लब येथून झाली. हल्ल्यानंतर काही दिवसांनी ग्राहकांच्या गर्दीने फुललेला लिओपोल्ड क्लब, छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या खूणा आपल्या मोबाईल कॅमेरात बंदिस्त करणारे नागरिक, दहशतवादी हल्ल्यातील एकमात्र जीवंत पकडण्यात आलेल्या कसाब या दहशतवाद्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलावर टिपलेले छायाचित्र, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेले ‘एटीस’चे प्रमुख हेमंत करकरे यांची अंत्ययात्रा या बरोबरच ताजमहाल आणि ट्रायड्रंट हॉटेल्सवरील हल्ला, तेथील नागरिक आणि पर्यटकांची करण्यात आलेली सुटका, नरिमन हाऊस आणि एनएसजी कमांडोची कारवाई, छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यानंतर रेल्वेस्थानकाच्या बाहेर उडालेली गडबड, नागरिकांची पळापळ, मेट्रो चित्रपटगृहाजवळील थरार, चर्नीरोड येथे झालेले दहशतवाद्यांचे एन्काउंटर, आपले कर्तव्य बजावताना बळी पडलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच या विषयाशी संबंधित अनेक छायाचित्रे प्रदर्शनात आहेत.

रुपारेलच्या अंगणी अवतरली पंढरीची वारी
रुपारेलच्या अंगणी अवतरली ‘पंढरीची वारी’!
प्रतिनिधी
टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात दादर येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालयात मंगळवारी सायंकाळी चक्क पंढरीची वारी अवतरली आणि उपस्थित सर्व श्रोतृवर्ग विठ्ठलमय होऊन गेला. पंढरपूरची वारी म्हणजे आषाढ किंवा कार्तिक महिना, असा आपला समज असताना चक्क माघ महिन्यांत ही वारी निघाली होती. या वारीने केवळ आळंदीहून प्रस्थानच केले नाही तर चक्क पंढरपूपर्यंतचा वीस दिवसांचा प्रवासही उपस्थितांना घडवला..
निमित्त होते ते मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग, श्रीपाद सेवा मंडळ आणि रुपारेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘वारी-एक शोध’ या कार्यक्रमाचे. काल या कार्यक्रमात डॉ.रोहन उपळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘वारी-एक प्रवासानुभूती’ हा कार्यक्रम सादर केला. भजन, किर्तन आणि पंढरीच्या वारीत जे कार्यक्रम होतात, त्याचे यथार्थ दर्शन या कार्यक्रमातून घडविण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंढरीची वारी हे मराठी संस्कृतीचे लणे असून गेली सातशे वर्षे ही वारी अखंडपणे सुरू आहे. यातून सामाजिक अभिसरणाचे महत्वपूर्ण काम घडत असून वारीच्यानिमित्ताने जाती-भेदाच्या िभती ओलांडून समाजातील विविध स्तरातील मंडळी एकत्र येतात. मात्र वारी संपल्यानंतर आपण वारीतले जीवन जगत नाही. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ असा अभंग आपण टाळ कुटून म्हणतो, परंतू ते प्रत्यक्षात कधी येणार, समाजातील गरजूंसाठी आपण काही करतो का, आपल्या स्वत:च्या पदराला किती खार लावतो, असे सवाल करून पणशीकर म्हणाले की, समाजाचा उद्धार होण्यासाठी प्रत्येकाने डोळस होण्याची आवश्यकता आहे.
पणशीकर यांच्या मनोगतानंतर ‘वारी-एक प्रवासानुभूती’ या कार्यक्रमास सुरुवात झाली. दोन मित्रांच्या संवादातून वारीतील दैनंदिन कार्यक्रम आणि वारीचा सर्व प्रवास उलगडत गेला व त्यातून उपस्थित श्रोत्यांना प्रत्यक्ष थेट वारीच अनुभवायला मिळाली.
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने वारीचा हा सोहळा सुरू झाला. वाटेतील या प्रवासात अन्य काही संतांच्या पालख्या त्यात सहभागी झाल्या. हैबतबाबा हे वारीचे जनक मानण्यात येतात. १८३२ मध्ये त्यांनी आखून दिलेल्या नियमानुसारच आजही संपूर्ण वारी पार पडते. वारीमध्ये ३०० ते ४०० िदडय़ा सहभागी असतात. सुरुवातीला मानाच्या २६ िदडय़ा सहभागी असतात. वारीत दररोज भजन, किर्तन, हरीपाठ आदी कार्यक्रम होतात अशी माहिती कार्यक्रमातून मिळाली.
‘रामकृष्ण हरी’ च्या गजरात वारीच्या सोहळ्यास सुरुवात झाली आणि ‘रुप पाहता लोचनी’ असा अभंग सुरू झाला. वारीतील मनोरे, पावल्या आदी पारंपरिक खेळ, भजनाचे प्रकार, समाज आरतीही या वेळी सादर करण्यात आली. वारीच्या प्रवासात भेटणारे वासुदेव, ज्योतिषी, न्हावी, पोतराज ही पात्रेही रंगमंचावर येऊन गेली. त्यांनी संत एकनाथ महाराज, संत सेना न्हावी यांनी रचलेले भारुड, अभंग सादर करून उपस्थितांना वारीतच असल्याचा अनुभव दिला.
व्यासपीठावर लावलेल्या मोठय़ा पडद्यावर प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीतील दृश्ये दाखविण्यात येत होती. यात दिवेघाटातील वारीचे मार्गक्रमण, जेजुरी आणि लोणंद येथील िरगण, वाखरीचे शेवटचे रिंगण आणि शेवटी ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे’अशा पंढरीरायाचे दर्शन आणि त्याची पूजा याचेही दर्शन घडविण्यात आले आणि वारीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात व मनात साठवत श्रोते विठ्ठलमय होऊनच मार्गस्थ जाहले..

Subscribe to:
Comments (Atom)