एकूण ३६ ‘लक्षवेधी’ पुस्तकांची निवड
‘ललित’ मासिकाच्या गेल्या वर्षीच्या लक्षवेधी पुस्तकात ‘बदलते विश्व’, ‘भिन्न’, ‘पाणीयावरी मकरी’ आणि ‘लोकमान्य ते महात्मा’
मुंबई, ६ जानेवारी / प्रतिनिधी
मराठी साहित्यातील पुस्तक प्रकाशक-ग्रंथविक्रेते तसेच चोखंदळ साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘ललित’ या मासिकाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या मासिकातर्फे दरवर्षी मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘लक्षवेधी’ पुस्तकांची निवड केली जाते. २००८ मधील अशा ललित लक्षवेधी पुस्तकांची निवड करण्यात आली असून त्यात ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या ‘बदलते विश्व’ या पुस्तकाचा अग्रक्रमांक आहे.
ललित लक्षवेधीमधून गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एकूण पुस्तकांमधून ३६ पुस्तकांची निवड करण्यात आली असून त्यात कविता महाजन (भिन्न), श्री. बा. जोशी (गंगाजळी), प्रा. राम शेवाळकर (पाणीयावरी मकरी), मॅजेस्टिक कोठावळे (संपादन-वि. शं. चौघुले), आणि डॉ. सदानंद मोरे (लोकमान्य ते महात्मा) यांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
‘ललित’ मासिकाकडे विविध प्रकाशकांकडून अभिप्रायासाठी जी पुस्तक येतात, त्यातून दरवर्षी ललित लक्षवेधी पुस्तकांची निवड करण्यात येते. ‘ललित’ मासिकाचे संपादक मंडळ आणि निवड समितीतर्फे ही निवड करण्यात येते. ललित लक्षवेधी पुस्तकांप्रमाणेच दरवर्षी वाचकांकडून मत मागवून काही पुस्तकांची निवड केली जाते. ही निवड ‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ म्हणून ओळखण्यात येते.
केतकर यांचे ‘बदलते विश्व’हे पुस्तक प्रेस्टिज पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. अन्य ललित लक्षवेधी पुस्तके पुढीलप्रमाणे - प्रा. डॉ. सुभाष भेंडे (होमकुंड)-मॅजेस्टिक प्रकाशन, शंकर सखाराम (एसईझेड)-सामंत पब्लिकेशन्स, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (ऊर्जेच्या शोधात)-राजहंस प्रकाशन, रामदास भटकळ (मोहनमाया)-मौज प्रकाशन, आनंद अंतरकर (छायानट)-ब्लू बर्ड इंडिया, प्रा. मोहंमद युनुस, अनुवादित-(बॅंकर टु द पुअर)-सुविद्या प्रकाशन, माणिक कानडे (जागतिक रंगभूमी)-रोहन प्रकाशन, श्री. बा. जोशी (गंगाजळी)-मॅजेस्टिक प्रकाशन. कविता महाजन (भिन्न)-राजहंस प्रकाशन,
मनस्वीनी लता रवींद्र (सिगारेट्स/अलविदा)-पॉप्युलर प्रकाशन, शिरीन इबादी, अझादेह मैवेनी, अनुवाद-प्रतिमा जोशी (इराण जागा होतोय)-कॉन्सेप्ट बुक्स, संपादन-विद्या बाळ (कथा गौरीची)-मौज प्रकाशन. माधुरी काळे (मादाम क्यूरी)-मॅजेस्टिक प्रकाशन, मर्मभेद-प्रा. मे. पु. रेगे यांचे टिकालेख (संपादक-एस. डी. इनामदार)-प्रतिमा प्रकाशन, संजय संगवई (उद्गार)-पॉप्युलर प्रकाशन), चंद्रकुमार नलगे (रातवा)-अजब पब्लिकेशन, संपादक-अवधूत परळकर (सर्वोत्तम सरवटे)-लोकवाङ्मय गृह)
हेमंत देसाई (सारथी)-अक्षर प्रकाशन, शब्दानंत (त्रभाषिक तथा व्यवहार उपयोगी शब्दकोश. कोशरचनाकार-सत्वशिला सामंत)-डायमंड पब्लिकेशन्स), प्रा. राम शेवाळकर (पाणीयावरी मकरी)-साहित्य प्रसार केंद्र, राणी दुर्वे (शब्देवीण संवादु)-परममित्र पब्लिकेशन्स). अन्य पुस्तकांमध्ये शांता गोखले (त्या वर्षी), सतीश तांबे (लेखाजोखा), मोनिका गजेंद्रगडकर (आर्त), संपादन-स्वाती कर्वे (स्त्री विकासाचे नवे क्षितिज), यशवंत रांजणकर (वॉल्ट डिस्ने-द अल्टिमेट फॅण्टसी), मंगेश नारायण काळे (नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत), चं. प्र. देशपांडे (बुद्धिबळ आणि झब्बू), शांताराम पारितोषिक कथा (प्रस्तावना-विलास खोले), डॉ. रमेश कुबल (आदिवासी नायक), किरण नगरकर (प्रतिस्पर्धी), भारतकुमार राऊत (अशी ही मुंबई), सचिन कुंडलकर (फ्रजमध्ये ठेवलेले प्रेम/पूर्णविराम).
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment