लिटिल चॅम्प्स’चा प्रवास येत्या रविवारी झी मराठीवर
प्रतिनिधी
झी मराठीवरील नुकत्याच संपलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाने प्रत्येक मराठी मनात घर केले असून संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमाने आणि त्यातील सहभागी पाच लिटिल चॅम्प्सने अक्षरश: वेड लावले होते. गेल्या रविवारी स्पर्धेची महाअंतिम फे री होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र रसिकांना येत्या रविवारी झी मराठीवरून ‘लिटिल चॅम्प्स’चा हा सुरेल प्रवास पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली या पाच जणांचा सुरेल प्रवास सकाळी दहा ते दुपारी चार अशा वेळेत पाहायला मिळणार आहे. प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि अंतिम विजेती कार्तिकी गायकवाड यांचा हा संगीतमय प्रवास आणि त्यांच्यात वेळोवेळी होत गेलेला हा बदल प्रत्येक रसिकाच्या हृदयात घर करून राहिला आहे. कार्यक्रम संपल्याची हुरहुर संगीत रसिकांना आहे. मात्र त्यांच्यासाठी झी मराठीने पुन्हा एकदा ही सुरेल संगीत मैफल सादर करण्याचे ठरवले आहे. या सर्व पाच जणांनी स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सादर केलेली विविध प्रकारची गाणी आणि त्याची अदाकारी या कार्यक्रमातून पुन्हा एकाद उलगडणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment