Sunday, April 19, 2009

शोध वारीचा

मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग घेणार ‘वारी’चा शोध!
मुंबई, ११ फेब्रुवारी / प्रतिनिधी
पंढरपूरची ‘वारी’ ही मराठी संस्कृतीचा एक अमूल्य ठेवा असून गेली वर्षांनुवर्षे वारीची ही परंपरा
लाखोंच्या उपस्थितीत अव्याहतपणे सुरू आहे. संत तुकाराम यांच्या चतुर्थ जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग, पुण्याचे श्रीपाद सेवा मंडळ आणि रुपारेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत दादर येथे तीन दिवसांच्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वारी-एक शोध’ असे या कार्यक्रमाचे नाव असून हा कार्यक्रम सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत डी. जी. रुपारेल महाविद्यालयात होणार आहे.
तीन दिवसांच्या या कार्यक्रमात कीर्तन सादरीकरण आणि विवेचन असे कार्यक्रम होणार असून १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. या वेळी ह.भ.प. मुकुंदराव जाटदेवकर आणि त्यांचे सहकारी वारकरी संप्रदायातील कीर्तन सादर करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीस ‘वारी-एक प्रवासानुभूती’ या कार्यक्रमात रोहन उपळेकर आणि त्यांचे सहकारी आपले अनुभव सांगणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शेवटच्या दिवशी ‘वारकरी वाङ्मय- एक आढावा’ हा चर्चात्मक कार्यक्रम होणार असून त्यात डॉ. शं. रा. तळघष्ी, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अरुण सावंत आणि प्रा. शिरीष कवडे सहभागी होणार आहेत.

No comments:

Post a Comment